ग्रामपंचायत कार्यालय पातुर्डा बु.येथे स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या

 

 

ग्रामपंचायत कार्यालय पातुर्डा बु.येथे स्त्री शिक्षणाचा पाया

रचणाऱ्या
भारतातील पाहिल्या शिक्षिका,समाज सुधारिका,स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्‍या
“क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले” यांची जयंती “महिला शिक्षक दिन” निमित्त गावाच्या प्रथम नागरिक लोकनियुक्त सरपंच श्रीमती शैलजाताई प्रकाशराव भोंगळ यांच्या हस्ते क्रांतिज्योति यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून यांच्या विचार,कार्य-कृतीला विनम्र अभिवादन करण्यात आले.उपस्थित सौ.संगीताताई गाडे,सौ.निर्मलाताई पुंडे,श्रीमति.भीमाबाई वानखडे,अन्सार पठाण,दिनकर इंगळे,विनायक चोपड़े, नीलेश चांडक, बबनराव डीखोलकर,सुनील इंगळे, राजू मांडवगडे हे ग्रा प सदस्य.ग्रामविकास अधिकारी मेहेंगे साहेब.संजय सातव,विलास इंगळे,लियाकत,विठ्ठल इंगळे,सुधाकर इंगळे,श्रीकृष्ण आमझरे, ज्ञानेश्वर पवार सर्व ग्रा प कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.*
*महाराष्ट्र शासनाने क्रांतीज्योती यांचा जन्मदिवस हा “महिला शिक्षण दिवस” म्हणून साजरा करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतल्यामुळे ग्रामपंचायत पातुर्डा यांनी ठराव घेऊन महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन केले.भविष्यात अशाच पद्धतीने क्रांतिज्योती व क्रांतीसुर्य या दाम्पत्यांना भारतरत्न देण्याची मागणी ग्रा प ठरावातून करण्यात आली.*

Leave a Comment