ग्रामपंचायत पळसगाव बाई येथील अतिक्रमणामुळे सदस्य ठरले अपात्र..

 

सिंदी (रेल्वे). ग्रामपंचायत पळसगाव बाई येथील दोन ग्रामपंचायत सदस्य यांचेवर अतिक्रमण कायद्याअंतर्गत जिल्हाधिकारी यांनी केली अपात्रतेची कार्यवाही, जिल्ह्यात आदर्श ग्राम म्हणुन नावलौकिक असलेल्या पळसगाव बाई येथील ग्रामपंचायत सदस्य गजानन धाबडधुस्के व लक्ष्मी ईरपाते यांचे अतिक्रमण असुन त्याबाबात जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.

अॅडव्होकेट परीक्षीत पेटकर यांनी अतिक्रमणबाबत ठोस पुरावे सादर करून बाजु मांडली तक्रारींचे अनुषंगाने गटविकास अधिकारी व तहसीलदार सेलू यांनी चौकशी करून अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर केले असून अहवालात अतिक्रमण असल्याचे जिल्हाधिकारी सुनावणी दरम्यान सिध्द झाले असून जिल्हाधिकारी यांनी अतिक्रमण कायदा १४ ज अंतर्गत कार्यवाही करीत ग्रामपंचायत सदस्य पदावरुन अपात्र घोषित केले आहे.

गजानन धाबडधुस्के यांनी स्वत: सदस्य पदावर असतांना घराचे बाजूला असलेल्या रस्त्यावर अतिक्रमण करून रस्ता बंद केला तसेच सदस्या लक्ष्मी ईरपाते यांचे पतीच्या नावे अतिक्रमण आढळून आले आहे . गावातील जागुत नागरीकांनी आलेल्या निर्णयाचे स्वागत केले असून अश्याप्रकारे स्वत: पदावर असतांना अतिक्रमण करून मिरवणाऱ्या व नाहक तक्रारी करून गावाची प्रतीमा मलीण करणा-या सदस्यांना चांगलाच चाप बसला आहे.

तक्रारकर्ते किशोर गोल्हर यांनी सदर निकालानंतर मत व्यक्त केले की, पळसगाव बाई येथील गावाचे सरपंच धीरज लेंडे यांचे पुढाकाराने ईतीहास नोंद घेईल इतका कायापालट झाला असतांना सदर सदस्य विरोधाचे राजकारण करुन विकास कामात अडथळा व नाहक तक्रारी करून गावाची प्रतीमा मलीण करीत असुन स्वत: पदावर असतांना अतिक्रमण करून असुन ईतर नागरीकांनी सदस्याकडुन काय आदर्श घ्यायचा त्यामुळे त्यांचेवर कार्यवाही मुळे भविष्यात अतिकमणाला आळा बसुन गावात अतिक्रम बाबत जबर निर्माण होईल..

गावात अतिक्रमण निर्मूलन जनजागृती व कार्यवाही बाबत सदस्यांचेच अतिक्रमण असल्यामुळे सरपंच म्हणुन कार्यवाही करतांना अडचण जात असुन नागरीकांचे बोलणे नेहमी ऐकावे लागत होते परंतु आता सदस्यावर अपात्रतेची कार्यवाही झाल्यामुळे भविष्यात अतिकमणाला आळा बसेल व गावातील अतिक्रमण कमी होण्यास मदत होईल..
*धिरज लेंडे, सरपंच*

Leave a Comment