Home Breaking News घरगुती वादातून महिलेची हत्या मारेकरी आरोपी ताब्यात :  पोलिसांचा तपास सुरू

घरगुती वादातून महिलेची हत्या मारेकरी आरोपी ताब्यात :  पोलिसांचा तपास सुरू

466
0

 

शहरातील आपातापा रोडवरील दमानी हॉस्पिटल मागे काल रात्रीच्या सुमारास घरगुती वादातून महिलेची हत्या केल्याची घटना रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. संगीता प्रशांत इंगळे असे मृतक महिलेचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी पतीस ताब्यात घेतले असून आणखीन एका आरोपीचा पोलीस तपास करीत आहे.

शहरातील सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आपातापा रोडवर संगीता प्रशांत इंगळे ही विवाहित महिला राहते. चाक़ू भोकसून पतीने केली पत्नीची हत्या  अकोला शहरातील सिव्हिल लाइन पोलिस स्टेशन हद्दितील घटना संगीता प्रशांत इंगळे असे मृतक पत्नीचं नाव तर प्रशांत इंगळे असं मारेकरी पतीचं नाव असून आरोपी पती प्रशांत इंगळे हां रोजगारकरिता नाशिक येथे असून तो आपल्या मुलाला नेण्याकरिता आज अकोल्यात आला होता. यावेळी प्रशांतच्या आपातापा रोड़वरील एकता नगरातील राहत्या घरी दोंघा पती-पत्नींमध्ये मुलाला नेण्यावरुन भांडण झाले होते. हे भांडण विकोपाला गेल्याने आरोपी पतीनं रागाच्या भरात पत्नी संगीता हिच्या पोटावर चाकुने वार करून तिची हत्या केली दरम्यांनं, गेल्या अनेक दिवसांपासून दोघां पती-पत्नीत वादात सुरु होता तेव्हापासून संगीता ही अकोट फ़ैल परिसरात रूम करून दोन्ही मुलांबरोबर राहत होती या वादातून सदर महिलेची हत्या करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम, पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेंद्र कदम, सिव्हिल लाईन पोलिस स्टेशनचे ठाणेदार भानुप्रताप मडावी यांनी तात्काळ पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून परिस्थितीजन्य पुरावे गोळा केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतल्याची माहितीही समोर आली आहे. हत्येमागील कारण अद्यापही स्पष्ट होऊ शकलेले नसून घरगुती वादातून हत्या झाल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी उशिरा रात्रीपर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Previous articleतलाठी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पौंधे यांना मारहाण , आरोपी विरुध्द गुन्हा दाखल
Next articleकापसाला चांगला भाव दिल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान-आमदार राजेश एकडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here