चंद्रपूरात “बापलेक” उपोषणावर! -प्रशासनाने नाही घेतली दखल !

 

चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील महादवाडी येथे वास्तव्य करणारे सिध्दार्थ गोमा रामटेके व रोहीत सिध्दार्थ रामटेके हे बापलेक गेल्या १३आक्टोंबर पासून आपल्या रास्त मागण्यांसाठी चंद्रपूर जिल्हा परिषद समोर साखळी उपोषणाला बसले आहे . एरव्ही उपोषणाला बसायचे म्हणजे छान पैकी एक मंडप उभारला जातो . भेटीसाठी येणा-या जाणां-या साठी दोन चार खुर्च्या ठेवल्या जातात .परंतू हे बापलेक कुठल्याही प्रकारचा मंडप न उभारता चंद्रपूर जिल्हा परिषद समोर साखळी उपोषणाला बसले आहे.आज या उपोषणाचा नववा दिवस आहे.परंतू प्रशासनाने या बाबतीत कुठलीही दखल घेतली नाही.ग्राम पंचायत महादवाडी यांचे कडे भत्ता व वेतनाची रक्कम थकीत आहे.या शिवाय त्यांना ग्राम पंचायतने परत कामावर घ्यावे अश्या प्रकारच्या त्यांचे अनेक मागण्या आहेत.अनेकदा त्यांनी पत्रांचे माध्यमातून या बाबत पाठपुरावा केला पण त्यांचे प्रयत्नाला यश आले नाही.शेवटी साखळी उपोषणाला बसुन त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले परंतु त्यांचे उपोषणाची दखल काल पर्यंत कोणीही घेतली नव्हती.आर्थीक परिस्थिती अत्यंत बिकट असलेल्या या बापलेका कडे जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष पुरवावे अशी मागणी आता सर्वत्र स्तरावरुन होवू लागली आहे.🟣 सुर्या मराठी न्यूज साठी चंद्रपूरवरून आमचे विशेष प्रतिनिधी किरण घाटे 🟣

Leave a Comment