नासिर शहा
पातूर प्रतिनिधी
पातुर : तालुक्यातील चांन्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चांन्नी ते पिंपळखुटा या मार्गावर वाळू वाहणाऱ्या MH 14 AZ /7245 या क्रमांकाच्या मिनी टाटा वहानाने दोन मजुर महीलाना धडक दिल्याने एक महीलां जागेवर ठार तर एक गंभीर जखमी झाले आहे सविस्तर वृत्त असे आहे की वाळूची वाहतूक करीत असलेले वाहन वेगाने जात असताना दोन मजूर महिला शेतात जात होत्या त्यांना आज सकाळी सात ते आठच्या दरम्यान या वाहनाने जबर धडक दिल्याची घटना घडली आहे यामध्ये शिलाबाई सरदार ही महिला जागेवर ठार झाली आहे.तर दुसऱ्या मुलीचे नाव बेबाबाई सोनोने या गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली या वाहनाच्या चालकावर व वाहनांवर 279 / 338/304 अ भादवी. सह कलम 134 मोटार वाहन कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे , व वान हे घटनास्थळी जागर उभे करून वाहन चालक फरार असल्याची माहिती मिळाली आहे पुढील तपास चांन्नी पोलिस स्टेशन करत आहे