चिखली गटविकास अधिकारी यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांना दाखवली केराची टोपली

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने प्रशांत ढोरे पाटील यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा व मुख्य कार्यकारी अधिकारी बुलढाणा यांच्याकडे कोरोना संक्रमण रोखण्यासाठी साहित्य खरेदी संदर्भात झालेल्या गैरव्यवहाराबाबत ग्रा. पं.सचिवांना पाठीशी घालत असल्याने जाधव साहेब गटविकास अधिकारी चिखली यांची तक्रार जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी बुलडाणा यांच्याकडे केली असता जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांनी स्वयंस्पस्ट कार्यपूर्ती अहवाल अभिप्रायासह शासनाकडे सादर करण्याचे आदेश दिले होते परंतु गटविकास अधिकारी चिखली यांनी त्या आदेशाला केराची टोपली दाखवलेली असल्याचे प्रशांत पाटील यांनी म्हटले आहे,
चिखली तालुक्यातील पंचवीस ग्रा. पं.नी कोरोना साहित्य खरेदीत गैर व्यवहार केल्याच्या वारंवार तक्रारी गटविकास अधिकारी पं. स.चिखली यांच्याकडे ग्रामस्थांनी व शेतकरी संघर्ष समितीद्वारे करण्यात आलेल्या असतांना देखील गट विकास अधिकारी जाधव यांनी सदर ग्रामसेवकांना पाठीशी घालत असल्याने व कोरोना साहित्य खरेदी संदर्भात झालेल्या व्यवहाराची चौकशी करण्यास टाळाटाळ करत असल्याने शेतकरी संघर्ष समितीद्वारे त्यांची तक्रार वरिष्ठांकडे करण्यात आलेली असल्याने त्या अनुषंगाने
उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांना जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या कडून सदर प्राप्त झालेल्या तक्रारीची तात्काळ कार्यवाही करण्यात यावे असे आदेश जारी केले असता उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पं. स. गटविकास अधिकारी यांना सदर विषयांकित प्रकरणी प्रशांत ढोरे पाटील शेतकरी संघर्ष समिती चिखली यांची तक्रार संदर्भीय विषया नुसार कार्यालयात प्राप्त झालेली असून सदर तक्रारींचे तात्काळ अवलोकन व्हावे व संदर्भीय तक्रार अर्जामध्ये नमुद मुद्यांची तात्काळ चौकशी करून नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येऊन केलेल्या कार्यवाही बाबतचे प्रशांत ढोरे पाटील यांना पंचायत समिती स्तरावरून कळवण्यात यावे तसेच आपला स्वयंस्पष्ट कार्यपूर्ती अहवाल अभिप्रायासह शासनाकडे व जिल्हा परिषद कार्यालयात सात दिवसाच्या आत सादर करण्याचे आदेश दिले होते,सदर आशयाचे पत्र पं. स. गटविकास अधिकारी चिखली यांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या कडून देण्यात आले होते परंतु आध्याप पर्यंत देखील तक्रार अर्जात नमूद मुद्यांची कुठली ही चौकशी केलेली नसून कुठलीच माहिती शेतकरी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांना देण्यात आलेली नसून उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सह जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला देखील चिखली गट विकास अधिकारी यांनी केराची टोपली दाखवलेली असल्याचे प्रशांत ढोरे पाटील यांनी म्हटले आहे.

Leave a Comment