Home Breaking News चिचारी गावामध्ये रेशन दुकानदाराची मनमानी

चिचारी गावामध्ये रेशन दुकानदाराची मनमानी

654
0

 

निलेश चिपडे
संपादक

संग्रामपूर तालुक्यातील चिचारी या गावाला उपलब्ध असलेल्या रेशन दुकानातील माल येवून ४ दिवस झाले असून गावातील दुकानात माल आलेला नसल्याने अद्यापही बंद आहे.

रेशन दुकान हे चिचारी गावाच्या नावाने अाहे, त्यामुळे गावातील रेशन दुकानात लोक रेशन घेण्यासाठी गर्दी करत आहे,परंतु दुकान मालक निमखेङी येथील असल्याने माझ्याच गावी रेशन घेण्यासाठी यावे, अशी मनमानी करत असल्याने गावातील रेशन घेण्यासाठी आलेल्या लोकांना रेशन न मिळाल्याने निराश होऊन माघार घ्यावी लागत आहे.

त्यामुळे या माहमारीच्या काळात रोजगार नसतांना स्वस्त धान्यही मिळत नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे..

तसेच संपूर्ण वस्ती आदिवासी असल्याने कंत्राटदार आपला दबाव टाकत आहे,कि रेशन पाहिजे असेल तर माझ्याच गावी यावे लागेल,

*गावात वृद्ध,महिला तसेच घरचे आजारी असताना लहान मुलांना रेशन आणण्यासाठी बाहेर गावात जावे लागत असल्याने आकस्मिक घटना घडत असतात याची प्रशासकीय अन्न पुरवठा अधिकारी यांनी जाणीव करून घ्यावी व तातडीने कारवाई करण्यात यावी.

 

Previous articleवैजापूर तालुक्यातील २२.६८ कि. मी लांबीच्या रस्त्यांना मंजुरी
Next articleन भूतो न भविष्यती असा इतिहास घडवला- सिद्धार्थ त्रिभुवन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here