यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे
तालुक्यातील राज्य महामार्गाला लागुन असलेल्या चुंचाळे गाव फाटा ते चुंचाळे गावा पर्यंतच्या रस्त्याची ठीकठीकाणी अपघातास आमंत्रण देणारे मोठमोठे खड्डे पडल्याने अत्यंत बिकट अवस्था झाली असुन , विविध आदीवासी गावांशी जोडणाऱ्या मार्गावर वाहनधारकांना आपले जिव धोक्यात घालुन आपली वाहने चालवावी लागत आहे .
बुऱ्हाणपुर ते अंकलेश्वर या राज्य महामार्गास लागुन असलेल्या चुंचाळे गाव फाटा ते चुंचाळे गावापर्यंतच्या सुमारे चार किलोमिटरच्या रस्त्याची मागील काही वर्षापासुन दयनिय अवस्था झाली असून, रस्त्याच्या मध्यभागी मोठमोठे खड्डे पडल्याने रस्ता अपघातास आमंत्रण देत आहे,
या वाहन वर्दळीच्या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांना वाहन चालवितांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे . दरम्यान काही वर्षा पासुन या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असुन , या संदर्भात चुंचाळे व बोराळे या सह परिसरातील गावांच्या ग्रामस्थांना वेळोवेळी परिसरातील लोक प्रतिनिधी ,यावल पंचायत समिती , सार्वजनिक बांधकाम विभाग यावल यांच्याकडे या मार्गाची दुरूस्ती व्हावी यासाठी वारंवार पाठपुरावा केला असुन
अद्यापपर्यंत या अत्यंत खराब झालेल्या या रस्त्याकडे कुणालाच वेळ नसल्याचे दिसुन येत आहे .दरम्यान या मार्गावर एखाद्या मोठा अपघात होण्यापुर्वीच प्रशासनाने त्वरित रस्ता दुरुस्त करावे अशी मागणी मोठया संख्येने ग्रामस्थ मंडळीकड्डन करण्यात येत आहे.
रस्ता बनवा अन्यथा पुन्हा रास्ता रोको: सुपडु संदानशिव यांनी आमच्या प्रतिनिधि सोबत बोलत असताना सांगितले कि,निवडणूक आल्यावर ग्रामस्थाची विनवनी करणारे लोकप्रतिनिधि मात्र आज रस्ता दुरुस्त करण्याच्या मागनीला कानाडोळा करत आहेत,अश्या प्रतिनिधिना आमच्या मत पेटिटून आम्ही नक्कीच जागा दाखवू असे त्यांनी बोलताना सांगितले आनी जर एक महिन्यात रस्ताच्या कामास सुरुवात नाही झाली तर पुन्हा रास्ता रोको करू असेही त्यांनी आमच्या प्रतिनिधि सोबत बोलताना सांगितले.