यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेड़े
तालुक्यातील वाघझीरा, चुंचाळे व सातपुडयाच्या पायथ्याशी असलेल्या जागृत देवस्थान मनुदेवी येथे भक्त निवास बांधणे (किंमत रुपये ५० लक्ष) या व्यतिरिक्त परिसरातील चुंचाळे येथे ३ बंधारे, वाघझीरा येथे १ बंधारे व मनुदेवी परिसरात १ बांधारे असा सुमारे ५० लाख रुपयांच्या निधिच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन चोपडा विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ.लताताई सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले .
या प्रसंगी कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार प्रा.चंद्रकांत बळीराम सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
चोपडा विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नानी विकासकामाच्या माध्यमातून खानदेश वासियांचे श्रद्धास्थान असलेल्या मनुदेवी मातेच्या दर्शनास येणाऱ्या हजारो भक्तांची भक्तनिवासाचे बांधकामानंतर निवासाची मोठी सोय होणार आहे. या अनुषंगाने पर्यटन विकास होऊन परिसरात लहानमोठ्या उद्योगांना चालना मिळणार असल्याचे माजी आ . प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले.
यावेळी कार्यक्रमास शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा कृउबाचे सभापती तुषार पाटील, शिवसेने यावल तालुकाप्रमुख रविंद्र सोनवणे, आडगाव सरपंच अमिना तडवी उपसरपंच प्रतिभा पाटील, सुवर्णा पाटील, गोटू सोनवणे, सुभाष अप्पा साळुंके, पिंपरी सरपंच मोहन कोळी,विकास सोलंकी सरपंच (उर्फ गोट्टू सोलंकी)
भरत सर चौधरी. दिनेश साळुंके, सुधाकर पाटील, नितीन पाटील, निलेश साळुंके, दीपक कोळी, हरी कोळी, भास्कर पाटील, शांताराम पाटील, प्रकाश कोळी, विनायक पाटील, रशीद तडवी, योगेश पाटील, सूर्यभान पाटील सर, राजू तडवी, पटवारी आबा, आत्माराम पाटील, संजय कोळी, आशिष झुरकाळे, विनायक अप्पा पाटील, पुंडलिक पाटील, युवराज पाटील, सुरेश पाटील, आत्माराम पाटील, रवींद्र पाटील, गोरख पाटील, संजय कोळी, सीताराम साळुंखे, जीवन वाणी, भरत चौधरी गजू कोळी, सचिन पाटील, सुनील पाटील, सिकंदर तडवी, शशिकांत शिंदे, संजय कोळी . रमेश धनगर. लोटू धनगर.तसेच आदि मान्यवर उपस्थित होते.