चुंचाळे रस्त्याची दयनीय अवस्था काय ते खड्डे काय तो रस्ता आणि काय ते लोकप्रतिनिधीसह संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

 

यावल ( प्रतिनिधी) विकी वानखेडे

तालुक्यातील चुंचाळे ते चुंचाळे फाटा असलेला रस्ता बऱ्हाणपूर अकंलेश्वर महामार्गाला व जळगाव जाण्यासाठी सोयीचा जोडणारा चुंचाळे ते चुंचाळे फाटा हा ३ किलोमीटर च्या रस्त्याची अंक्षरशा चाळण झालेली आहे.

या रस्त्यांची स्थिती अतिशय कठीण झाल्याने येथील ग्रामस्थांचे जगणेच कठीण झाले आहे यामुळे लोकप्रतिनिधीसह सार्वजनिक बाधकामाचे अधिकारी यांच्याबद्दल संताप व्यक्त होत आहे तर काही सुज्ञ नागरिक व तरुण आदोलंनाच्या पावित्र्यात आहे.

दरम्यान चुंचाळे ते चुंचाळे फाटा पर्यंत असलेला ३ किलोमीटर रस्त्यावर मोठमोठे खंड्डे पडलेले असून देखील या रस्त्यावरुन मार्गक्रमण करणे म्हणजे अपघाताला निमत्रण देणे आहे या रस्त्याकडे संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधीसह प्रशासनाचे अक्षंम्य असे दुर्लक्ष झाले आहे का?

असा प्रश्न नागरिकांना पडला आहे हा रस्ता नव्याने करणा गरजेचा आहे गेल्या दोन ते तिन वर्षापासून या रस्याची दुरावस्था झाली आहे यामुळे ग्रामस्थामधून तिव्र संताप व्यक्त होत आहे याच रस्त्यावरून चुंचाळे ,बोराळे ,गायरान,नायगाव,मालोद,आडगाव,दहिगाव,सौखेडासिम,असे अनेक गावे जोडलेली आहेत तसेच जळगाव जाण्यासाठी देखील हा रस्ता सोयीचा ठरतो या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते रस्ता दुरुस्तीचे काम सार्वजनिक बाधकाम विभागाणे त्वरीत हाती घ्यावे अशी मागणी

चुंचाळे सह परिसरातील वाहनधारकांनकडून होत आहे चोपडा मतदार संघाचे आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांनी लक्ष देत डांबरीकरण करुन घेतले पाहिजे पुर्ण मतदार संघातील गावामध्ये आमदार लताताई सोनवणे यांनी भरपूर निधी देऊन विकास कामे केली आहे

यासाठी मतदारांमधून त्यांच्या कामाचे कौतूक ही केले जाते तरी चुंचाळे ते चुंचाळे फाटा या रस्त्याला निधी उपलब्ध करुण ते काम देखील मार्गी लावावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे ऐवढेच नाही तर काही गरोदर महीलांची प्रसृती ही रिक्षामध्ये करण्याची वेळ आलेली होती,असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.त्यात चुंचाळे पासुन चुंचाळे फाटा पर्यंतचा ३ किलोमीटर चा रस्ता चुंचाळे ते दहिगाव ५ कि.मी.रस्ता जीवघेणा झालेला आहे.

अनेकदा मागणी करूनही येथे नविन रस्ता होत नसल्याने ग्रामस्यांमधे तिव्र नाराजी व्यक्त होत आहे.
चुंचाळे गावाची लोकसंख्या ही चार हजाराच्या आसपास आहे. छोट गाव असल्याने बहुतांश कामासाठी यावल किवा जळगाव जावे लागते.त्यामुळे येथुन बाहेर गावाला जाणे व बाहेर गावाहुन गावात येणे ही खुपच मोठे संकट असते.

आठवडे बाजार, शेती साहीत्य,खते,अत्यावश्यक दवाखाना या गोष्टींसाठी तर इच्छा नसतांनाही साकळी येथे जावे लागते. एकुणच या रस्त्याच्या समस्येने येथील ग्रामस्थांचे जगणे कठीण झाले आहे.तरी या जिवघेण्या रस्त्यांवर अनेकदा लहान अपघात झालेले आहे.यामुळे या गंभीर व जिवघेणा ३ किलोमीटर चा रस्ता तात्काळ मार्गी लागावा,अशी मागणी ग्रामस्थ करत आहे.

Leave a Comment