Home Breaking News चोरीच्या सात दुचाकी जप्त;गुन्हे शाखेची कामगिरी

चोरीच्या सात दुचाकी जप्त;गुन्हे शाखेची कामगिरी

246
0

 

गोंदिया-शैलेश राजनकर

तुमसर-पोलिस स्टेशन तुमसर व परिसरातून दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण वाढल्याने पोलीस स्टेशन तुमसर येथील गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपासाचे सुत्र हलवत अवघ्या दहा दिवसात सात चोरीच्या दुचाकी जप्त करुन आरोपींना जेरबंद केले.
मोहमद अनिस रईस (३0) रा. संघर्षनगर नागपूर, सुरज बलबिर सिंग (२0) रा. भवानी मंदिर संघर्ष नगर पारडी, दामोदर बाजिराव काटवले (३५) रा. तामसवाडी (तुमसर), नितीन कृष्णा गुर्वे (२४) रा. नवरगाव (तुमसर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या ताब्यातून दुचाकी क्र. एम. एच ३१ व्ही. एस. ८३९२, एम. एच. ३१ सी. टी. ९६२८, एम. एच. ४९ ए. 0१४६, एम. एच. ४0 ए. ई. ५८६५, एम. एच. ३६ एम. ३६४७, एम. एच. ३१ डी. ई. ७६0८, एम. एच. ३६ एम. ६८२६ जप्त करण्यात आल्या आहेत. सदर दुचाकी या तुमसर व नागपूर येथून चोरी करण्यात आल्या होत्या. तसेच पोलीस स्टेशन तुमसर येथे चालू वर्षात एकुन तिन दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल होते. त्या तिनही दुचाकी व नागपूर येथील चार दुचाकी चोरणार्‍यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. सदर कारवाई पोलिस निरीक्षक रामेश्‍वर पिपरेवार यांचे मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक संजयकुमार टेकाम, पोलिस हवालदार ओमप्रकाश चिचखेडे, संजय गर्जे, दिलीप धावडे, रितेश बर्वे, विनोद थोटे, बापुराव हुलगुंडे यांनी केली आहे.

Previous articleजळगाव न प चे मुख्य अधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे नगरसेवकांचा आत्महत्येचा प्रयत्न
Next articleआदर्श ग्राम वकाना ग्रामस्थांनी केला शंकर पुरोहित यांचा राज्यस्तरीय आरोग्य मित्र पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here