Home बुलढाणा जळगाव जामोद येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्‍यांचे जळगाव नांदुरा रोडवर शांततामय मार्गाने चक्काजाम...

जळगाव जामोद येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्‍यांचे जळगाव नांदुरा रोडवर शांततामय मार्गाने चक्काजाम आंदोलन सुरू

306
0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगाव जामोद मध्ये आज दिनांक 8 डिसेंबर रोजी महा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा जळगाव ते नांदुरा रोडवर सकाळी साडे पाच वाजेपासून शांततामय मार्गाने चक्काजाम आंदोलन सुरू झालेले आहे केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी विषयक कायदे रद्द करण्यासाठी दिल्ली येथील शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज सकाळपासूनच महा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जळगाव शहरामध्ये जळगाव ते नांदुरा रोड तसेच जळगाव वरवट जळगाव जामोद या रोडवर सकाळपासूनच शांततामय मार्गाने चक्काजाम आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे तसेच जळगांव जामोद शहर संपुर्ण बंद.मोदी सरकारने केलेल्या शेतकरी कृषी कायद्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने शहरात संबड वाजवुन केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.या आंदोलनात काँग्रेस पक्ष नेत्या स्वातीताई शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख दत्ताभाऊ पाटील, मीनाताई सातव, अर्जुन घोलप, शिवसेना नेते तुकाराम भाऊ काळपांडे,नगरसेवक रमेश ताडे, अविनाश उमरकर शांताराम दाणे, संजय भुजबळ प्रशांत दाभाडे,राजेश पांधी,विशाल पाटील,जुनेद,युवराज देशमुख,अनिकेत पाटील ल,अफ्रोस भाई,साबिर भाई, यांच्यासह बहुसंख्य महा विकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या बंदमध्ये सहभाग घेतला आहे

Previous articleसुनगाव येथे महा विकास आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ चक्काजाम आंदोलन
Next articleभारतबंदला संग्रामपूर तालुक्यात भारत बंद चा उस्फुर्त प्रतिसाद…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here