जळगाव जामोद येथे विहिरीत उडी घेऊन २२वर्षीय तरुणाने केली आत्महत्या

 

जळगाव जामोद/पल्लवी कोकाटे

जळगाव जामोद येथील नगरपरिषदेच्या पाठीमागील वस्तीमध्ये राहणाऱ्या बावीस वर्षीय करण अजबराव तायडे या तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल दिनांक ३ऑगस्ट रोजी एक वाजे दरम्यान उघडकीस आली.सदर युवक दिनांक एक ऑगस्ट पासून घरातून निघून गेला होता.तो घरी आलाच नाही.सदर हा तरूण मनोरुग्ण व दारू पिण्याच्या सवयीचा असल्यामुळे त्यांनी याच कारणामुळे आत्महत्या केल्याचे समजते.मृतक करण चे वडील अत्यंत गरीब असून मोल मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.सदर घटनेची माहिती विनोद झाडे यांनी मृतक करण तायडे यांच्या वडिलांना सांगितली असता अजाबराव तायडे यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला सदर घटनेची फिर्याद दिली.घटनेची माहिती मिळताच जळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक घोडेस्वार सुनील वावगे तसेच बालकृष्ण पवार सचिन राजपूत निलेश पुंडे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेहाला विहिरीतून बाहेर काढले व ग्रामीण रुग्णालयातील राजू बुटे यांच्या जय भवानी रुग्णवाहिकेने सदर मृतदेहाला शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आले.सदर जय भवानी रुग्णवाहिकेचे चालक दिपक तायडे यांनी तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध केल्याने त्यांची नागरिकांनी आभार मानले.शव विच्छेदनानंतर सदर मृतकाचे शव त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले अत्यंत शोकाकुल वातावरणात कुटुंबीयांनी मृतक करण याचा दफनविधी केला.सदर मृतकाने व्यसनाधीनतेने हे पाऊल उचलल्याचे समजते.पोलिसांनी फिर्यादी मृतकाचे वडील अजबराव तायडे यांच्या रिपोर्टवरून मर्ग दाखल केला.पुढील तपास जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक किशोर घोडेस्वार , पोलीस हेडकॉन्स्टेबल विनोद वानखडे पोलीस शिपाई योगेश निबोंळकर करत आहेत.

Leave a Comment