जळगाव येथील सावन साहेबराव वानखडे भीम आर्मी शहराध्यक्ष व कार्यकर्ते जळगाव जामोद पोलिसांना निवेदन देऊन मागणी केली आहे.
अन्यथा आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे जळगाव जामोद शहर परिसरात सट्टा पत्ता दारू मटका गुटका पोलीस दूरक्षेत्राचे हाकेच्या अंतरावर हे अवैध धंदे चालतात याकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे भीम आर्मी शहराध्यक्ष यांच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहेत सुरू असलेल्या अवैध धंद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कुटुंब उद्ध्वस्त करत आहे.
या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे भीम आर्मी शहराध्यक्ष सावन वानखडे व कार्यकर्ते जळगाव जामोद पोलिसाला निवेदन देऊन केली आहे अन्यथा मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्याचा इशाराही या निवेदनाद्वारे दिला आहे तसेच निवेदनाची प्रत जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा, पोलीस महानिरीक्षक अमरावती,पोलीस विभाग अधिकारी यांना पाठवली आहे.