Home बुलढाणा जळगाव जा तालुक्यात मडाखेड येथे वाघांच्या जोडीची हजेरी सुरक्षेसाठी वनविभागाला गावकऱ्यांचे निवेदन

जळगाव जा तालुक्यात मडाखेड येथे वाघांच्या जोडीची हजेरी सुरक्षेसाठी वनविभागाला गावकऱ्यांचे निवेदन

327
0

 

गजानन सोनटक्के
जळगाव जा

जळगाव जामोद तालुक्यातील मडाखेड चावरा येनगाव शिवारात दोन वाघाची जोडी वावरत असून अनेक लोकानी त्याना पाहिले असल्याचे ठाम आणि खात्रीशीर मत आहे असे निवेदनात म्हटले आहे. हे निवेदन पणन महासंघाचे संचालक प्रसेनजीत जी पाटील यांच्या लेटर हेड वरून वनविभागाला दिले असून संबंधित शीवारातील अनेक लोकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. सुगीचे दिवस असताना सोयाबीन कपाशी मका व इतर पिके काढनिवर आलेले आहेत आशा वेळी शेतकरी शेतमजूर शेतावर जाण्यास धजावत नाही कारण या श्वापदांमुळे हरिणी आणि शेळी यांच्या शिकारी झालेल्याचे अवशेष जनतेने तसेच प्रत्यक्ष वनविभागाने पाहिलेले आहेत तरीही जनतेच्या सुरक्षेबाबत उपाययोजना केलेली नाही camera लावणे सापळा पिंजरा शॉप लावणे स्टॉल लावणे ई .ची उपाययोजना करावी अन्यथा होणाऱ्या जीवित हानीस संबंधित विभाग आणि शासन जबाबदार राहणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे..

Previous articleराष्ट्रीय महामार्ग क्र.६ ची अत्यंत दुरावस्था झाली असून, जागोजागी पडलेले खड्डे चुकवितांना अपघात घडत आहेत.
Next articleकोरोना नव्हे तर उपासमारीनेच मरण्याची वेळ! तेल्हारा तालुका मंडप बिछायत असोसिएशनचे धरणे आंदोलन आणि शांती मार्च संपन्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here