जळगाव तालुका मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाच्यावतीने विविध मागण्यांसाठी दिले निवेदन

 

गजानन सोनटक्के
जळगाव जामोद

 

Covid-19 या महामारी मुळे जाहीर केलेल्या लोकांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती मुळे सर्वसामान्य कष्टकरी जनतेचे जीवन उद्ध्वस्त झाले शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही मजुरांच्या हाताला काम नाही यामुळे सर्वसामान्य जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे तसेच या लॉकडाऊन मध्ये रस्त्यावर व्यवसाय करणारे छोटे व्यवसायिक यांचे व्यवसाय ठप्प झाले त्यांच्याकडे इतर कोणतीही उपजीविकेचे साधन नसल्यामुळे त्यांचे वर सुद्धा उपासमारीची वेळ आली आहे सर्व कष्टकरी समाजघटकांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या मागण्या म्हणजे स्वामीनाथन कमिशनच्या सर्व शिफारशी ची अंमलबजावणी करण्यात यावी ग्रामीण व शहरी भागात रोजगार हमी कायदा लागू करा अंगणवाडी व आशा वर्कर या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या अंगणवाडी कर्मचारी आशा वर्कर यांना covid-19 च्या कामात लागणारे सुरक्षा साधने देण्यात यावे अतिवृष्टी मध्ये जळगाव संग्रामपूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसाना ची भरपाई म्हणून हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या छोटे छोटे व्यवसायिकांना साडेसात हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात यावी आणि ऑनलाइन शिक्षण प्रणालीमुळे समाजातील आदिवासी आर्थिक वंचित भटके या समाजातील छोटी छोटी मुले शिक्षणापासून फेकल्या जाऊनही म्हणून शिक्षण हे शाळेतूनच देण्यात यावे अशा मागण्या निवेदन जळगाव तालुका मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाच्यावतीने स्थानिक उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत माननीय प्रधानमंत्री यांना देण्यात आले निवेदनावर रामेश्वर काळे ज्ञानेश्वर तायडे विजुभाऊ पोहकर सौ सरला ताई सौ सविता ताई चोपडे नाजमा बी वजीर खा वंदना डोंगरदिवे अनुसया वडाळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या निवेदनावर होते

Leave a Comment