Home Breaking News जळगाव येथे एल.सी.बी ची कारवाईत पाच पिस्टल व 15 कार्तुस सह ३लाख...

जळगाव येथे एल.सी.बी ची कारवाईत पाच पिस्टल व 15 कार्तुस सह ३लाख १४ हजाराचा मुद्देमाल जप्त..

1014
0

 

 

एक आरोपी अटक तर एक फरार..

जळगाव जामोद येथे बुर्हाणपूर रोडवर एलसीबी बुलढाणा यांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून मोटरसायकलवर ५ पिस्टल व १५ कार्तुस घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला पकडले .त्यांच्याकडून एकूण ३ लाख १४ हजार ४४० झोपायचा रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एका आरोपीला ताब्यात घेतले.
तर एक आरोपी फरार होण्यात सफल झाला आहे.
बुलढाणा येथील LCB पथकाने गुप्त माहितीच्या आधारे जळगाव ते बऱ्हाणपूर जाणाऱ्या रस्त्यावर 12 नोव्हेंबर च्या रात्री या सापळ्यात जळगाव पासून दोन किलोमीटर अंतरावर दोन व्यक्ती हिरो सीडी डीलक्स विना नंबरची या जुनी गाडीवर जात असताना त्यांची विचारपूस करून तपासणी केली असता, त्यांच्याकडून एका प्लास्टिकच्या कॅरीबॅग मध्ये पंधरा जिवंत काडतुस व सिल्वर रंगाच्या तीन देसी पिस्टल मॅक्झिन सह व दोन काळ्या रंगाच्या पिस्टल मॅक्झिन किंमत 250000 सह व त्यांच्याकडून एक सॅमसंग कंपनीचा मोबाइल किंमत 5000 १९४० रुपये रोख असे एकूण ३१४४४०/-₹ मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध पोउपनि भगवान श्रीकांत जिदानवार राहणार बुलढाणा यांच्या तक्रारीवरून आरोपी १) भुरू भवानसिंग रावत वय २५ रा शेकपूर ता खकनार जिल्हा बुऱ्हाणपूर २)सोडी जठ्ठा यांच्याविरुद्ध आर्मअक्ट ३/२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई ठाणेदार सुनील जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक आडे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली आहे. फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.

 

 

Previous articleआकोला पोलिस दलाचा कौमिक एकता चषकास आजपासून सुरुवात
Next articleकासारी येथे स्व.गोपीनाथरावजी मुंडे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here