जालना जिल्ह्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे चौफेर विकासासाठी कटीबद्ध:

 

प्रतिनिधी:(जालना)जिल्ह्यातील विविध विषयांबाबतची बैठक उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री मा.श्री.रावसाहेब पाटिल दानवे,यांच्या प्रमुख उपस्थितित सह्याद्री अतिथीगृह,मुंबई येथे आज दुपारी झाली.

आमदार श्री संतोष दानवे,आमदार श्री नारायण कुचे, श्री.भास्कर आबा दानवे आणि मंत्रालय व जालना जिल्ह्यातील वरीष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

जालन्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील विकास कामे आणि प्रस्तावित खर्चाचे सादरीकरण उपमुख्यमंत्री फडणवीस यांना केले.जालना नगरपालिकेची पाणी पुरवठा योजना,

जालना शहरासाठीच्या सौर उर्जा प्रकल्पाचा व्यवहार्यता अहवाल तयार करणे,जालना नगरपरिषदेअंतर्गत 13 रस्त्यांची कामे, मोती तलाव विकास व सुशोभीकरण, फुलंब्रीकर नाट्यगृहाची डागडुजी, जाफराबाद, भोकरदन, अंबड, बदनापूर या गावांच्या पाणी पुरवठा योजनेचा सुधारीत प्रस्ताव,पूर्णा नदीवरील केटीवेअर आदी मागण्यांसंदर्भात उपमुख्यमंत्री यांनी सकारात्मक निर्देश दिले.

प्रतिनिधी:तुकाराम राठोड,जालना

Leave a Comment