जालना तालुक्यामध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात:

 

(तुकाराम राठोड/जालना)

प्रतिनिधी:(जालना)जिल्ह्यासह तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करावे याबाबत प्रशासनाकडून तहसीलदार श्रीकांत भुजबळ साहेब यांनी तलाठी,मंडळ अधिकारी यांना निर्देश दिले आहे.त्यामुळे बाजीउमृद येथील तलाठी जाधव साहेब यांनी प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन पिकाची पाहणी केली व नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामा केला. सदर ठिकाणी कपाशी,सोयाबी,बाजरी,मका सह अनेक पिकांचा बाजीउम्रद गांव व ताडा येथे पंचनामा करण्यात आला.यावेळी तलाठी जाधव साहेब,सरपंच संजय राठोड, उपसरपंच विष्णू राठोड,उत्तम पवार,झाबुसिंग पवार,दतु चव्हान,विजय पवार,शिवाजी राठोड सह अनेक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment