जालना तालुक्यामध्ये ठीक- ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस,शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान,पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी:

 

तुकाराम राठोड,सावंगी तलाव,ता.जि.जालना

प्रतिनिधी:(जालना)आज दिनांक २८/०९/२०२२ रोजी बुधवारी जालना तालुक्यातील सावंगी तलाव,उमरी,दहीफळ,पाहेगाव,साळेगाव,पारेगांव,वाडी,जैतापूर,मानेगाव,मोती गव्हाण,बाजीउमृद सह अनेक गावांमध्ये व शेतामध्ये मुसळधार पाऊस व चक्रीवादळामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात शेती पिकाचे नुकसान झाले आहे.परीसरात अचानक संध्याकाळी ७.०० वाजता वीजा सहीत मोठया प्रमाणात मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यासह सह हातातोंडाशी आलेल्या सोयाबीन, कापूस व तुरीचे मोठ्या प्रमाणात जमीनदोस्त झाली आहे.तसेच अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे हाता-तोंडाशी आलेला घास हातातुन जात असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे.सदरील झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच चक्रीवादळामुळे झालेल्या पिकांची तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना एकरी ५०,०००/-(पन्नास हजार रुपये) आर्थिक मदत द्यावी.जेणे करून शेतकऱ्यांवर आलेल्या नैसर्गिक संकटावर थोड्याफार प्रमाणात मात होईल.तसेच तात्काळ पंचनामा करावे अशी विनंती शेतकरी वर्गाकडून करण्यात येते आहे.

Leave a Comment