सागर जैवाळ सिल्लोड तालुका प्रतिनिधि
महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्री ना. वर्षा गायक्वाड यांना इंग्रजी शाळाच्या संस्थापक संघटनेन दिनांक 17/09/2020 रोजी इंग्रजी शाळेच्या व विद्यार्थी व शिक्षकांच्या समस्या सोडविण्यात यावा या करिता मेस्टा संघतनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पी.एन.यादव यांनी जालना जिल्हा मेस्टा संघटनेचे पदाधिकारी सोबत घेउन निवेदन दिले. या वेळी आमदार कैलासजी गोरंट्याल आमदार राजेश राठोड कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाउ देशमुख, मेस्टाचे राजु तारे, ज्ञानेश्वर पुंगळे, भाऊसाहेब गोरे, संजय चव्हाण, रविंद्र दानी, बळीराम जाधव, रोहण यादव, सोपान सपकाळ, दुर्गेश नवले, ज्ञानेश्वर घुगे, अन्ना भालमुडे, अनिल गावडे, नय्युम पठाण हे सर्व उपस्थित होते,.
निवेदनात देण्यात आलेले मुद्दे
1. इंग्रजी शाळांना आर्थिक मदत देण्यात यावी.
2. RTE 25% चे इंग्रजी शाळेचे 3 वर्षाचे थकीत देयके देण्यात यावे.
3. स्वयं अर्थ्सहायित कॉलेजच्या 11 व 12 विच्या विद्यर्थ्यांना शिश्यवृत्ती देण्यात यावी.
4. कोरोनाचा प्रादुर्भाव थांबेपर्यंत इंग्रजी शाळेच्या शिक्षकांना शासनाकडुन वेतन व मानधन देण्यात यावा.
5. कोरोनाच संकट संपल्यावर शाळा सुरु झाल्यानंतर किमान 2 वर्ष इंग्रजी शाळांच्या विद्यार्थ्यांची फी माफ करुन विद्यार्थ्यांची फी शासनाने इंग्रजी शाळांना देण्यात यावी.
वरिल मागण्यांचे निवेदन मेस्टा संघतनेमार्फत मा. वर्षाताई गायक्वाड यांना देण्यात आले