जिल्हा संपर्कप्रमुखपदी खासदार प्रतापराव जाधवचं मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आदेश…..

 

जिल्हयातील सर्व नियुक्त्यांचे अधिकार संपर्कप्रमुखांकडे…

बुलडाणा : – जिल्हा शिवेसना संपर्कप्रमुख खासदार प्रतापराव जाधव यांची पुनश्चनियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हि नियुक्ती केली आहे. महत्वाचे म्हणजे जिल्हयातील सर्व पदाधिकारी नियुक्तीचे अधिकारी संपर्क प्रमुख खासदार प्रतापराव जाधव यांना देण्यात आले आहेत.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत जिल्हयातील दोन शिवसेना आमदार डॉ. संजय रायमुलकर, संजय गायकवाड हे नविन भाजप सेना सरकार स्थापनेमध्ये सामील झाले. सोबतच दिल्लीत बारा खासदारांनी एकत्र येत शिंदेना समर्थन देत एन.डी.ए. मध्ये सहभागी झाले. बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचाही यात समावेश आहे. आपण शिवसेना सोडलेली नाही. हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेवुन आपण पुढे जात आहोत. अशि भुमिका खासदार प्रतापराव जाधव यांनी या आधिच जाहीर केली आहे. आज महाराष्ट्र सदन दिल्ली येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडेच बुलडाणा जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख पदी पुनश्च नियुक्ती केली आहे. तसेच जिल्हयातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे अधिकार त्यांनाच बहाल केले आहेत. याप्रसंगी खासदार प्रतापराव जाधव यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रसंगी सत्कार केला. यावेळी लोकसभेतील गटनेते खा. डॉ. राहुल शेवाळे, खा. हेमंत पाटील, खा. कृपाल तुमाने, खा. धैर्यशिल माने, खा. सदाशिव लोखंडे उपस्थित होते.

Leave a Comment