Home Breaking News जिल्ह्यात घातक शस्त्रे येतात कुठून? मॅक्झिन असलेली पिस्टल, जिवंत काडतूस जप्त… एलसीबीची...

जिल्ह्यात घातक शस्त्रे येतात कुठून? मॅक्झिन असलेली पिस्टल, जिवंत काडतूस जप्त… एलसीबीची कारवाई..

792
0

 

सुनिल पवार नांदुरा

(सूर्या मराठी न्युज)

नांदूरा- खामगाव हायवेवरून जिवंत काडतूस, मॅक्झिन व पिस्टलसह एका आरोपीला एलसीबीने जेरबंद केले आहे.तत्पूर्वीही तलवारी, पिस्टल अशी घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहे. मात्र ऐवढी घातक शस्त्रे बुलडाणा जिल्ह्यात येतात तरी कुठुन? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

जलंब पोलिस स्टेशन हद्दीत नांदुरा- खामगाव हायवेवर आरोपी अब्दुल मोबीन अब्दुल समद रा. नांदूरा जि. बुलडाणा व एक फरार आरोपी याच्याकडून १ मॅक्झिन असलेली पिस्टल, १ जिवंत काडतूस, १ रिकामी काडतूस, ३ मोबाईल, १ झायलो कार असा ५ लाख ६१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरुद्ध ३ / २५ शस्त्र अधिनियमानुसार गून्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराज सिंग राजपूत, अप्पर पोलीस अधीक्षक, बजरंग बनसोडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांचे आदेशाने
पोउपनि निलेश शेळके,
श्रीकांत जिंदमवार,गजानन आहेर,युवराज शिंदे,सतीश जाधव,सरिता वाकोडे,सचिन जाधव यांनी केली.गेल्या महिन्याभरात जिल्ह्यात बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर लगाम लावण्यात एलसीबीला यश येत असले तरी, घातक शस्त्रे येतात कुठून ? याची पाळेमूळे शोधण्याची गरज निर्माण झाली आहे.

Previous articleसोशल मीडियातून जवळीक साधून मुलीवर अत्याचार ,गुन्हा दाखल
Next articleप्रिया चा आदर्श इतर मुलींनी घ्यावा !अपघातात हात गमावलेल्या च तरुणांशी केले प्रियांनी लग्न !एकमेकांचा आधार घेऊन संसार फुलवणार – ….!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here