जीवनाला हो म्हणाअमली पदार्थाला नाही म्हणा

0
206

 

आज 26 जून अंमली पदार्थ विरोध

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

शेगाव.अमली पदार्थ दिनानिमित्त पो.स्टे. शेगांव शर येथील परी. पो.उप.अधीक्षक श्री. विवेक पाटील, पो.नि. विलास पाटील, पो.उप.नि. आशिष गंद्रे यांनी शेगांव येथील ST. XAVIER’S ENGLISH SCHOOL, SHEGAON

येथील विद्यार्थी-विद्यार्थिनींना शरीरा करता अपायकारक असलेल्या अमली पदार्थ सेवनाचे होणारे नुकसानाबाबत मार्गदर्शन केले. अमली पदार्थ सेवन करणार नाही म्हणून शपथ घेण्यात आली. सोशल मीडिया माध्यमातून चित्रपट, लघु चित्रपट, वेब सिरीज, रील्स, फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम, इत्यादी माध्यमांपासून दूर राहून प्रक्षोभक बाबींपासून अलिप्त राहणे बाबत सूचना दिल्या.

अमली पदार्थ सेवनाचे मार्गदर्शनाकरिता शालेय नाविन्य तरून पिढीपासून जनजागृती करण्याची सुरुवात केली.

तसेच शेगांव शहरात छ्त्रपती शिवाजी महाराज चौक, गांधी चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असे गावांतील मुख्य चौरसत्याचे वर्दळीच्या ठिकाणी अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त बॅनर दर्शवून अमली पदार्थाचे सेवनाकरिता विरोध करावा बाबत जनजागृती केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here