मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश बावस्कर
” ध्येयाने प्रेरित होऊन विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम केल्यास कोणतेही असाध्य ध्येय सहज प्राप्त होऊ शकते,त्यासाठी मनात जिद्द ठेवून काम करत रहा. जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर जे काही तुम्ही ध्येय ठरवाल त्यात टॉप करा संपत्ती चोरीला जाऊ शकते पण ज्ञान असे भांडार आहे की ज्यावर कोणीही दरोडा टाकू शकत नाही, कोणीही चोरून नेऊ शकत नाही. जीवनातील परिवर्तनासाठी शिक्षण अतिशय महत्त्वाचे आहे शिक्षण घेत असताना संस्काराला संस्कृतीची जोड द्या त्याशिवाय समाज जिवंत राहणार नाही” असे आवाहन विधान परिषद सदस्य आमदार एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर येथे केले, सर्व गुणवंत मुला मुलींना सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्र देऊन संवेदना फाउंडेशन तर्फे सन्मानित करण्यात आले.
सौ रोहिणी ताई खडसेंमार्फत संवेदना फाउंडेशन तर्फे मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील इ. 10वी /12वी तील पहिल्या पाच गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभात ते बोलत होते.यावेळी पदवीधर मतदारसंघाचे आमदार सुधीरजी तांबे,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या साहेब पाटील, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा तथा संवेदना फाउंडेशनच्या अध्यक्षा रोहिणी ताई खडसे खेवलकर ,माफदा अध्यक्ष विनोद तराळ , राष्ट्रीय काँग्रेस सरचिटणीस डॉ जगदीश दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला
यावेळी नगराध्यक्षा मनिषाताई पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष यु डी पाटील सर, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, युवक जिल्हा उपाध्यक्ष पवनराजे पाटील, कार्याध्यक्ष दिपक पाटील,माजी सभापती विलास धायडे, दशरथ कांडेलकर,राजु भाऊ माळी, . भरत अप्पा पाटील,ज्ञानेश्वर महाजन
जि प सदस्य निलेश पाटील, रामदासभाऊ पाटील राष्ट्रीय काँग्रेसचे जेष्ठ नेते एस ए भोई सर,रामभाऊ पाटील,शिवा पाटील,भरत अप्पा पाटील,सुधीर तराळ,विकास पाटील,प्रदिप साळुंखे, रवींद्र दांडगे,प्रविणपाटील, बापू ससाणे,बबलू सापधरे,बाळाभाऊ भालशंकर,रविंद्र पाटील, अमोलभाऊ महाजन, नंदकिशोर हिरोळे,मुन्ना बोडे,नईम खान,संदिपभाऊ जावळे, विनोद काटे,चेतन राजपुत
संस्थाचालक मिठुलाल अग्रवाल,व्ही एस वराडे,बोडे,माणिकराव पाटील, भास्करराव पाटील, अंकुश चौधरी, सुधीर भाऊ तराळ, दिनेश पाटील,डॉ. दिलीप पानपाटील,डॉ रियाज पठाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी विविध शाळांचे मुख्याध्यापक सुद्धा उपस्थित होते, प्राचार्य आरपी पाटील मुक्ताईनगर,व्ही के वळस्कर मुक्ताईनगर,मधुकर महाजन उचंदा,मिलिंद संग्रामपूरकर घोडसगाव,प्रवीण धुंदले,खिर्डी, विजय लोंढे निमखेडी,प्रकाश बावस्कर अंतुर्ली,विजय चौधरी चांगदेव, श्री दाणे सर सुकळी इत्यादीचा समावेश होता.
प्रसंगी बोलताना आमदार खडसे यांनी मतदारसंघातील सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन मिळावे यासाठी चांगला कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल संवेदना फाउंडेशनच्या रोहिणीताईंचे कौतुक केले.सत्कार हे केवळ निमित्तमात्र असतात, पण या सत्कारातून मिळालेली प्रेरणा मुलांच्या पाठीवर मिळालेली शाबासकीची थाप मुला-मुलींना यशस्वी जीवन जगण्याचा मार्ग दाखवते. शहरातील विद्यार्थ्यांपेक्षा ग्रामीण विद्यार्थ्यांच्या नशीबी अधिक संघर्ष असल्याचे सांगून आज मुक्ताईनगर मतदारसंघातील अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मोठ -मोठ्या पदांवर सेवेत असल्याबद्दल आमदार खडसेनी स्पष्ट केले. यावेळी आजच्या कार्यक्रमाला शाळांसह विद्यार्थी व पालकांनी खूप मोठ्या संख्येने प्रतिसाद दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले,यावेळी आमदार खडसे यांनी विधान परिषद सभागृहात शिक्षकांचे प्रश्न आक्रमकपणे मांडणाऱ्या आमदार सुधीर तांबे यांचे अभिनंदन केले.
यावेळी आमदार तांबे यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज करताना सर्वप्रथम, “मी सुद्धा नाथाभाऊंचा फॅन असून त्यांच्या प्रदीर्घ अनुभवामुळे ते सभागृहात अनेकांचे मार्गदर्शक आहेत.” असे स्पष्ट केले . प्रसंगी मतदारसंघातील प्रत्येक शाळेतून पहिल्या पाच गुणवंतांना संवेदना फाउंडेशन तर्फे गौरवण्यात आल्याबद्दल, आयोजक सौ रोहिणी खडसें यांचे विशेष अभिनंदन केले यावेळी भारतीय मुले प्रचंड बुद्धिवान असल्याचे जगाच्या पाठीवर सिद्ध झाल्याचे विविध उदाहरणे देऊन आमदार तांबे यांनी स्पष्ट केले,प्रसंगी राज्यातील शाळांमध्ये असलेली अपूर्ण शिक्षक संख्या, विनाअनुदानित शाळा यामुळे हाल अपेष्टात जगणारा बहुसंख्य शिक्षकवर्ग…. या सदोष शिक्षण व्यवस्थेबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. शेती आणि शिक्षण देशाला समर्थ व बलवान बनवतात. दर्जेदार शिक्षण मिळाल्यास जगात भारताचे नाव अग्रक्रमावर राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या आधी भैय्यासाहेबांनी व्यासपीठावरील दोन्ही आमदार श्री एकनाथराव खडसे व आ. सुधीर तांबे यांचे अभिनंदन केले. महाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कशी वाढवता येईल?यासाठी दोघे पोट तिडकीने बाजू मांडत असल्याचे सांगितले.जळगाव जिल्ह्यात अशा प्रकारच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन केल्याबद्दल रोहिणीताईंचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सौ रोहिणीताईंनी प्रास्ताविक केले दहावी -बारावीचे वर्ष विद्यार्थ्यांच्या जीवनाला कलाटणी देणारे असून भविष्यात यशाने हुरळून न जाता कधीकधी अपयशसुद्धा पचवता आले पाहिजे, असे सांगून अपयश ही सुद्धा यशाची पहिली पायरी असल्याचे स्पष्ट केले.या गौरव सोहळ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिक बळ मिळते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला कोणतीच गोष्ट फुकट आणि सहज मिळत नाही असे सांगून संघर्षातून मिळालेली यशाचे मोल किती तरी पटीने अधिक असून जितका संघर्ष मोठा तितके यश अधिक असते. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशात गुरुजनांसह आई-वडिलांचाही सहभाग अधिक असल्याचे सांगून गुणी विद्यार्थ्यांचा समाजाला अभिमान असल्याचे स्पष्ट केले मोठेपणी तुमच्या कर्तुत्वाने तुमच्या नावावरून आई वडिलांची ओळख समाजाला होत असल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
कार्यक्रमाप्रसंगी कुमारी स्नेहा शरद अवसरमल, ऐनपुर हिने मनोगत व्यक्त केले. “मी नाथाभाऊंची फॅन असून नाथाभाऊंसारखा चाणाक्ष आणि सर्व क्षेत्राची जाण असलेला अभ्यासू नेता होणे नाही “अशा शब्दात नाथाभाऊंची महती वर्णीली.या सत्कार सोहळ्यात सत्कार केल्याबद्दल ऋणी राहून भविष्यात कुटुंबीयांचे नाव रोशन करेल असा विश्वास तिने व्यक्त केला,तर प्रज्ञा ज्ञानेश्वर चव्हाण मुक्ताईनगर हिने सुद्धा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी कवितेचे वाचन करून रात्रंदिवस परिश्रम घेऊन प्रगती साधण्याचा मंत्र उपस्थित मुला-मुलींना दिला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले त्यात सौ मनीषा कचोरे मनुर बु ता. बोदवड, रामराव मुरकटे खिरोदा ता. रावेर, विजय चौधरी पिंप्री नांदू ता. मुक्ताईनगर यांचा समावेश होता, या सर्वाना आ एकनाथराव खडसेंच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. साळवे,प्रा. विजय डांगे प्रा. प्रतिभा ढाके यांनी केले.