Home Breaking News झाड कोसळयाने बालकाचा मृत्यू तर दोन जखमी चांगेफळ येथील घटना

झाड कोसळयाने बालकाचा मृत्यू तर दोन जखमी चांगेफळ येथील घटना

838
0

 

संग्रामपूर :- तालुक्यातील चांगेफळ फाटा जवळील मेनरोड ला लागून असलेले मोठे जुनाट चिंचेचे झाड कोसळून 10 वर्षीय बालकाचा मृत्यू तर दोन युवक जखमी झाल्याची घटना आज 29 सप्टेंबर रोजी दुपारी 3.15 वाजताच्या दरम्यान घडली आहे.
प्राप्त माहितीनुसार , संग्रामपुर ते जळगांव जामोद मेन रोडवरील चांगेफळ फाटा जवळील वेल्डींग शॉप समोर गावातील लहान मुले खेळत असतांना व रस्या वरील दुचाकी वाहन जात असतांना अचानकपणे एक मोठे जुनाट चिंचेच्य झादाची फांदी कोसळयाने यामध्ये बालक भावेष सुभाष साबे वय 10 वर्ष रा.चांगेफळ याचा दबून जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीस्वार दशरथ ओंकार खंडेराव वय 40 वर्ष रा.चांगेफळ हे गंभीर जखमी झाले तर शेतात जात असलेला युवक किरकोड जखमी झाला आहे. गावातील नागरिकांच्या मदतीने बालकांवर पडलेल झाड कापुन सदर मुलाचे प्रेत बाहेर काढण्यात आले . या घटनेची माहिती मिळताच तामगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत विखे , बीट जमदार राठोड यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करुन मृतक बालकाला वरवट बकाल येथील ग्रामिण रुग्णालयात छवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले . कटर मशीनच्या साहाय्याने पडलेले झाड तोडण्यात आले असून थांबले वाहतूक सुरुकरण्यात आली .. हयोवळी मोठया प्रमाणात गावकऱ्यांनी गर्दी केली होती.

Previous articleहत्याकांडातील आरोपी 24 तासात पोलिसांच्या जाळ्यात
Next articleआमगाव पोलिसांनी मास्क नसलेल्या दुचाकी वाहनांवर कारवाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here