ठाकरे सरकार शेतकऱ्यां कडे लक्ष द्या.- बाळराजे जाधव.

 

गेवराई प्रतिनिधी- नवनाथ आडे

गेवराई तालुक्यात या वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे कापसाचे चांगले उत्पादक आले आहे. परतीच्या पावसाने घातलेल्या धुमाकूळामुळे शेतातला कापूस घरात आणला. दमदार पावसामुळे कापूस ही जोमात आला होता. यामुळे शेतकरी राजाने वेळोवेळी औषध फवारणी करत मशागत केली होती. परतीच्या झालेल्या पावसामुळे आलेले कापसाचे बोंड शेतातच सडत होते. तर फुटलेल्या कापसाच्या जागेवरच वाती होत होत्या . अशा परिस्थितीतही शेतकर्यांनी कसे बसे कापूस वेचून घरात आणला आहे. बहुतांश लोकांच्या घरात कापूस आहे. त्यांनी आता जिनिगंला कापूस नेत आहेत. परंतु तिथे चार ते पाच दिवस काडकडीच्या थंडीत मुक्काम करावा लागत आहे. शेतकर्यांचे अजून असे किती दिवस चालणार या वर ठाकरे सरकार कधी लक्ष केंद्रित करणार असा प्रश्न शेतकरी राजा ला निर्माण होत आहे.
मुख्यमंत्री साहेब आपल्या सि.सि.आय वर आमचे शेतकरी राजा कापुस आणतात तर शेतकऱ्यांना सि.सि.आय वर चार.पाच दिवस मुंकामाला थंडीत थांबावे लागतात त्यांना जेवन वेळेवर भेटत नाही . एक तर दोन ते तीन जिनिंगाना सि.सि.आय ची परवांगी द्या नसता त्याना दोन टाईमाचा जेवण द्या.आसा ईशारा गेवराईचे तालुका प्रमुख रयत शेतकरी संघटना बाळराजे जाधव यांनी प्रतिनिधीशी बोलतांना सागितले

Leave a Comment