शेगाव अर्जून कराळे
अध्यक्षपदी सचिन कडूकार
शेगाव (प्रतिनिधी) : मराठी पत्रकार परिषद संलग्नित डीजीटल मिडीया परिषदेची शेगाव तालुका कार्यकारिणी गठीत बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत बर्दे यांनी जाहिर केली.
यात शेगाव तालुकाध्यक्ष पदी सचिन कडूकार यांची निवड करण्यात आली आहे.
तसेच उर्वरित कार्यकारणीत उपाध्यक्ष अर्जुन कराळे,रवि शेगोकार,सचिव लक्ष्मण कान्हेरकर,सहसचिव सुरज देशमुख,कोषाध्यक्ष उमेश राजगुरे,संघटक श्रीकांत कलोरे,सुभाष वाकोडे,प्रसिध्दी प्रमुख प्रशांत खत्री, सहसंघटक सागर सिरसाट,सदस्य देवचंद्र सम्दुर,ईस्माईल शेख, ज्ञानेश्वर कुकडे व सल्लागार अनिल उंबरकार,राजेश चौधरी,नंदकिशोर कुळकर्णी,नारायण दाभाडे,श्रीधर ढगे,उमेश सिरसाट यांचा समावेश आहे.
बुलढाणा येथील जिल्हा पत्रकार भवनमध्ये मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष राजेंद्र काळे यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बर्दे यांनी शेगाव तालुका डिजीटल मिडिया परिषद ची कार्यकारिणी जाहिर केली.यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष अजय बिल्लारी,सरचिटणीस संदिप शुक्ला,उपाध्यक्ष अनिल उंबरकर,शेगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष धनराज ससाने,काशिम शेख,संदिप वानखडे,सुभाष लहाने आदीची उपस्थिती होती.