जळगाव जामोदः- डॉ . अविनाश पाटील समाधान हॉस्पीटल जळगाव जामोद यांच्या विरुध्द पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे संजय भोंगाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये डॉ . अविनाश पाटील यांचे विरुध्द जळगाव जामोद कोर्टाने गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला होता त्यानुसार पो.स्टे.जळगाव जामोद येथे डॉ.अविनाश पाटील समाधान हॉस्पीटल यांचे विरुध्द भा.दं.वि.चे कलम ३०४ , ३१६ , ३१८ , ३३६ , ३३८ , २ ९ ४ , ५०४ व ५०६ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता . त्याकारणाने डॉ . अविनाश पाटील यांनी वि . अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय खामगाव येथे अटकपूर्व जामीन मिळण्याकरीता अर्ज दाखल केला होता . परंतु सदरचा अटकपूर्व जामीन अर्ज वि . अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय खामगाव कोर्टाने फेटाळला असुन सरकारी पक्षाच्या वतीने अॅड . उदयजी आपटे सरकारी वकील खामगाव व फिर्यादीच्या वतीने अॅड . रुपेश विश्वेकर , ॲड पी.एस.मनसुटे व अॅड . अभिमन्यु वाघ ( पाटील ) यांनी बाजु मांडली .