इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
शेगावः पुष्करणा ब्राह्मण समाजातील प्रगल्भ बुद्धीच्या असलेल्या छत्तीसगड की बेटी म्हणून प्रख्यात डॉ. प्रियंका व्यास बिस्सा यांना युवकांची राजकारणात सकारात्मकता वाढविण्यासाठी समाज माध्यमांची भुमिका एक विश्लेषण, मुल्याकंन या विषयावर डॉक्टरेट प्रदान करण्यात आली.
सदर पीएचडी डॉ. सुभाष चंद्राकर यांच्या मार्गदर्शनात पुर्ण केली. राष्ट्रपती पदकाव्दारे सन्मानित डॉ. प्रियंका व्यास बिस्सा यांनी समाजमाध्यमाव्दारे युवापिढी राजकारणात सशक्त अशंतः व गुणात्मक दोन्ही बाजूंचे सविस्तर विश्लेषण केले आहे. देशात अशा प्रकारचे हे पहिलेच संशोधन आहे. कर्मवीर चक्र प्राप्त डॉ. प्रियंका व्यास बिस्सा यांच्या अध्यायनातुन युवकांची राजकारणातील भुमिका प्रभावी ठरणार आहे.
प्रियंका व्यास बिस्सा ह्या शेगांव येथील हिंदू महासभेचे दिवंगत राष्ट्रीय नेते शालीग्रामजी जोशी यांची नात असून अकोल्याचे प्रख्यात अभियंते राजेश रामकिसन व्यास यांच्या स्नुषा आहेत.
प्रियंका बिस्सा यांना पीएचडी मिळाल्याने पुष्करणा ब्राह्मण समाजा मध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत असून समाज बांधवांनी एकमेकांना पेढे खाऊ घालून आनंद साजरा केला तसेच खामगाव अकोला शेगाव तेल्हारा इत्यादी ठिकाणच्या समाज बांधवांनी तसेच श्रीमती सरस्वती व्यास, सौ. शिलादेवी व्यास, . राजेश व्यास, देवेश व्यास देविका व्यास यांच्यासह व्यास परिवारातील अन्य मान्यवरांनी प्रियंका बिसा व्यास यांचे अभिनंदन कौतुक केले आहे.