डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी अभिवादन

 

शेगाव प्रतिनिधी  इस्माईल शेख 

वंचित बहुजन आघाडी तालुका शेगावच्या वतीने भारतरत्न विश्वभूषण महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शेगाव तालुक्याच्या वतीने विश्रामगृह शेगाव येथे महा अभिवादन सभा घेण्यात आली.

यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सदस्य मधुकर बाबुळकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा निर्वाण आणि महापरिनिर्वाण या विषयावर त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

यामध्ये तिंत्रव येथील सरपंच माननीय विनायकरावजीं हिंगणे, मोहनराव विश्वासराव कराळे तालुका उपाध्यक्ष सुनील भाऊ निळे ,गजानन सोळंके ग्राम शाखा अध्यक्ष महागाव ,शिवाजी गुरव तालुका महासचिव, यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना शब्दरूपी अभिवादन केले.

तर जिल्हा उपाध्यक्ष श्रीकृष्ण पहुरकर, शंकरराव पहुरकर जिल्हा उपाध्यक्ष, यांचे सुद्धा अभिवादन सभेवर शब्द रुपी अभिवादन केले तर कैलास भाऊ दाभाडे ,आशिष भाऊ शेगोकार ,गौतम इंगळे यांनी सुद्धा डॉ. बाबासाहेबांना भावपूर्ण अभिवादन केले.

संदेश कुमार शेगोकार व जिल्हा युवा अध्यक्ष अनिल भाऊ वाकोडे यांनी अभिवादन सभेला मार्गदर्शन केले, अभिवादन सभेला प्रमुख उपस्थिती तालुकाध्यक्ष दादाराव अंभोरे, सुनीता ताई इखारे तालुका अध्यक्ष महिला आघाडी, शहराध्यक्ष संगीता ससाने, जिल्हा सदस्य वनमाला ताई इखारे, आशाताई सावदेकर, तालुका प्रसिद्ध प्रमुख पंडितराव पर्घरमोर,शेख नसीर शेख गफ्फर ,अर्जुन शेगोकार, धम्मपाल बाबुळकर, युवा नेतृत्व संजय भाऊ वाकोडे, संतोष राव हिवराळे तालुका उपाध्यक्ष, राहुल अनिल मोरे, चित्रपट सेनेचे निखिल पहुरकर, उदयनराजे सुरवाडे, युवा नेते क्षितिज कुमार निर्वाण ,युवा शहर सल्लागार अशोक भाऊ तायडे ,संतोष भाऊ तायडे, प्राची धम्मपाल बाबुळकर या मुलीने सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले.

आकाश दादा चोपडे ग्राम शाखा अध्यक्ष चिंचखेड, सागर शिरसाठ ग्रामशाखाध्यक्ष गव्हाण, येउलखेडचे सरपंच प्रकाश गवई, भास्करराव शिरसाट ,कपिल भाऊ शिरसाठ, तर भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुका सरचिटणीस आदरणीय बोधिसत्व गवई तसेच राजकिरण सावदेकर यांच्यासह कार्यकर्ते हजर होते तर अभिवादन सभेचे सूत्रसंचालन वंचित बहुजन आघाडीचे शहर युवा नेते माननीय दीपक भाऊ इंगळे यांनी केले.

Leave a Comment