डोंगर कठोरा आदीवासी आश्रमशाळेत कार्यरत सफाई कामगार यांनी केली गळफास घेत आत्महत्या पोलीस घटनास्थळी दाखल

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील डोंगरकोटा येथील आदिवासी आश्रम शाळेतील शिपाई सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे या संदर्भात मिळालेली माहिती

अशी की डोंगर कठोरा तालुका यावल येथील आदिवासी आश्रम शाळेत सफाई कामगार काम म्हणून कामास असलेले नामदेव दगडू खैरनार वय ५६ वर्ष यांनी आज दिनांक ८ मे २०२३ सोमवार रोजी वेळ माहीत नाही ते आश्रम शाळेचे कर्मचारी राहात असलेल्या खोलीच्या ठिकाणी त्यांनी छताला दोरी बांधुन दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुदैवी घटना समोर आली आहे.

नामदेव खैरनार हे२०१६पासुन मागील आठ वर्षापासून डोंगर कठोरा आदिवासी आश्रम शाळेमध्ये सफाई कामगार म्हणून कार्यरत होते, आज सकाळीच त्यांनी आपल्या वड्री तालुका यावल या गावाला राहणाऱ्या मोठया मुलाला फोन करून मला माझ्या लहान मुलाशी बोलायचे आहे असे बोलुन लहान मुलाशी बोलणे झाले नाही त्या वेळी त्यांनी मोठया मुलाशी माझी तब्येत खराब आहे असे सांगितले

व मला भेटायला ये असे सांगितले व माझ्या खिशातील चिठ्ठी वाचुन घ्याची असे सांगीतले असे बोलणे झाल्यावर तात्काळ त्यांना भेटण्यासाठी डोंगर कठोरा आदिवासी शाळेवर त्यांचा मोठा मुलगा आणि सून हे आले असता त्यांच्या येण्याची आधीच त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडतील आले .

घटनास्थळी पोलीस उपनिरिक्षक सुनिल मोरे व पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पहोचले असल्याचे वृत्त प्राप्त झाले आहे .
मयताचा मुलगा गोपाळ नामदेव खैरनार यांनी यावल पोलीस ठाण्यात खबर दिल्याने अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असुन , पुढील तपास यावलचे सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रकाश वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक सुनिल मोरे हे करीत आहे .

Leave a Comment