( प्रतिनिधी )विकी वानखेडे . यावल तालुक्यातील डोंगर कठोरा गावात झालेल्या लाखो रुपयांच्या विविध कामांचा खेळखंडोबा निविदा अटीशर्ती नियम धाब्यावर ठेवुन बांधण्यात आलेल्या कामांची वरीष्ठ पातळीवर चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडुन होत आहे . यावल तालुक्यातील डोंगर कठोरा या गावात मागील वर्षी २०२०मध्ये १४ व्या वित्त आयोग , दलीत वस्ती सुधार योजना, रोजगार हमी योजना असो अशा विविध शासन पातळीवरील योजनांच्या माध्यमातुन लाखो रुपयांचे निधी जिल्हा परिषद आणी पंचायत समितीच्या माध्यमातुन उपलब्ध झाला होता . दरम्यान या योजनांच्या कामांना ग्रामपंचायत पातळीवर करण्यात आले असुन गावातील झालेली सर्व विकासकामे ही गुणवत्ता नसलेली व अत्यंत निकृष्ठ प्रतिची झालेली आहे .डोंगर कठोरा ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच वगळता सर्व सदस्यांची झालेली अपात्रता त्यावर प्रशासकाची नेमणुक अशा गोंधळलेल्या कारभारात संधीसाधु ठेकेदार व आर्थिक स्वार्थाला बळी पडणारे पंचायत समितीचे भ्रष्ठ अधिकारी यांच्या संगमताने झालेल्या या विकास कामांची पुर्ण वाट लावण्यात आली असुन गावात नुकत्याच संपलेल्या निवडणुकीत सर्व नवख्यांना संधी मिळाली असुन या विजयी झालेल्या नव र्निवाचित ग्रामपंचायत कारभाऱ्यांनी झालेल्या या कामांची गुणवत्ता तपासावी व शासनाचे नियम धाब्याव ठेवुन निकृष्ठ कामे करणाऱ्या संबधीत ठेकेदारावर कारवाई करावी अशी अपेक्षाकृत मागणी ग्रामस्थांकडुन करण्यात येत आहे .