Home Breaking News डोणगांव येथे भारत मुक्ती मोर्चा च्या वतिने माता रमाई जंयती साजरी !

डोणगांव येथे भारत मुक्ती मोर्चा च्या वतिने माता रमाई जंयती साजरी !

329
0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

मेहकर तालुक्यातील डोणगांव येथील त्रिरत्न बुध्दविहारात दि . ७ फेब्रुवारी रोजी भारत मुक्ती मोर्चा च्या वतीने माता रमाई यांची जयंतीनिमित्त आभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष मा.भागवत जाधव हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन बामसेफचे मा. आर.बी.डोंगरदिवे व मा.बि.एस.सदार हे होते तर प्रमुख उपस्थिति मा.मुरलीधर लांभाडे जि.संयोजक राष्ट्रीय किसान मोर्चा, मा.सुखनंदन हांडे सर,मा.शेख शफीसर प्रोटान ; मा.गजानन भगत,मा.परमेश्वर रोटे हे मान्यवर उपस्थीत होते..

यावेळी मा.डोंगरदिवे सर,सदार सर,लांभाडेसाहेब,हांडेसर शेख सर यांचे आभिवादन पर भाषणे झाली .

अध्यक्षीय भाषणात भागवत जाधव यांनी माता रमाईचा जिवन संघर्ष कसा होता याविषयी बोलतांना ते म्हणाले की जर माता रमाई यांनी जर ठरवले असते तर त्या काळात त्या हजार हजार रुपयाच्या साड्या नेसुन चांगले दागीणे घालून जगातल्या नामवंत बॅरिस्टर यांच्या पत्नी म्हणुन राहु शकल्या असत्या पंरतु भारतात जो समाज हजारो वर्षापासुन बहिष्कृत व शोषीत आहे त्या समाजाला माणुस म्हणुन जगण्यासाठी जो संघर्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी चालू केला होता तो यशस्वी होण्यासाठी व माणसाला माणुस म्हणुन जगण्यासाठी स्वतच्या व परिवाराच्या व संसाराच्या सर्व हौस नाकारुन संपुर्णपणे आंदोलनला सह्योग करणाऱ्या माता रमाईमुळेच यांच्या त्यागामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहिण्या पर्यंतचा प्रवास करू शकले म्हणुन आज आपण मानव म्हणुन जगत आहोत याच्यामागे केवळ माता रमाई यांचा त्याग,समर्पण, व बहुजन समाजाविषयी तळमळ आहे हे आपण विसरता कामा नये..

Previous articleयावल भुसावळ रोडवर ट्रॅक्टर मोटरसायकलचा भिषण अपघात दुचाकीस्वार जागीच ठार
Next articleश्रीराम रेडिमेट अँड क्लॉथ सेंटरच्या प्रथम वर्धापन दिनी करण्यात आला पत्रकारांचा सत्कार…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here