सिंदखेड राजा ( सचिन खंडारे)
सध्या गेल्या आठवडा भरा पासून वातावरणामध्ये बदल झाला आहे ढगाळ वातावरण काही ठिकाणी निर्माण झाली आहे !याचाच परिणाम तूर पिकावर वाढला आहे तुरीच्या झाडाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये फुले आले असून ढगाळ वातावरणामुळे फुले गळून पडू लागली आहे !तर काही ठिकाणी तुरीच्या झाडावरती आळ्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे !
तर तूरीच्या झाडावरती फवारणी हाच एकमेव पर्याय असल्याचे मत कृषी अधिकारी यांनी व्यक्त केला आहे अगोदरच शेतकरी यावर्षी अतिवृष्टीमुळे हवालदिल झाला आहे आणि अशातच या हंगामामध्ये शेतकरी तुरीचे उत्पन्न घेत असतो :अगोदरच अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे आणि आता वातावरणामध्ये बदल झाल्यामुळे तुरीवर अळीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे !सोयाबीन नाही झाली तरी चालेल परंतु तुरीच्या उत्पन्नावर आपण घर गाडा चालू अशी शेतकऱ्यांची इच्छा असते !शिवाय तुरीला बाजार भाव सुद्धा जास्त असतो !परंतु तुरीवर अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने तुरीवर औषधांची फवारणी हाच एकमेव पर्याय असल्याचे मत कृषी पर्यवेक्षक गणेश बंगाळे यांनी व्यक्त केले आहे ।