तण नाशक फवारणी करुनही तण कायम शेतकरी अडचणीत..

 

कृषी विभाग पंचायत समिती अधिकार्याणे लक्ष देण्याची गरज..

दिपक देशमुख
मेहकर तालुका

मेहकर:तालुक्यातील 86हजार हेक्टर पैकी आत्तापर्यंत तब्बल 67 हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे.सोयाबीन पेरा मोठ्याप्रमाणावर होत असल्याने शेतकऱ्यांना खुरपणी साठी मजुर भेटत नसल्याने शेतकरी आता तण नाशकाकडे वळले असुन पेरणी झाल्यावर लगेच ४८/७२तासाच्या आत फवारणी करावी लागते आणि पेरणी झाल्यानंतर पिक १८ते २१ दिवसांनी असे दोन प्रकारचे तणनाशक शेतकरी फवारत असतो.यावर्षी मात्र तणनाशक फवारणी करुन देखील तण मेले नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान तणनाशक कंपनीमुळे झाले आहे.
कपाशी पेरा मेहकर तालुक्यात कमी होत असुन सोयाबीन पिकाकडे शेतकरी नगदी पिक म्हणुन पहात आहे.त्यामुळे आता सोयाबीनचा पेरा वाढलेला आहे लहान मोठे शेतकरी देखील आता मुंग उडीदाचा पेरा कमी करून केवळ सोयाबीन पिकालाच प्राधान्य देत आहे.कमी मशागतीत चांगले उत्पन्न आणि भावही चांगले मिळत असल्यानेच शेतकऱ्यांनी दुसऱ्या पिंकाचा पेरा कमी केला आहे. हलक्या मध्यम जमीनीवर ही सोयाबीन पिकाची वाढ चांगली होते परंतु त्यामध्ये तणाचे प्रमाण कमी करण्यासाठी बैलाच्या साह्याने कोळपणी (डवरणपाळी) पिकातील तणनियंत्रण करण्यासाठी
एक किंवा दोन वेळेस करत होते. नंतर शेतकरी खुरपणी करत करत होते.तेव्हा बोलले जायचे खुरप्याची आणी…..अमृताचे पाणी परंतु आता मात्र बाजारात शेकडो तणनाशक कंपन्या उतरल्या आणि शेतकऱ्यांचे काम सोईचे झाले।काही तणनाशक तर सोयाबीनची पेरणी झाल्याबरोबर फवारले तर तण उगतच नाही एवढी शक्ती ह्या औषधात आहे.दुसरे जर पेरणी झाल्याबरोबर फवारणी करता नाही आली तरी पेरणी झाल्यावर पिक १८ ते २१ दिवसांनी तणनाशक फवारणी करावी लागते. मजुर मिळत नाही आणि मिळाले तर खुरपणी साठी मोठ्या प्रमाणावर मजुरी द्यावी लागते.त्यामुळे शेतकरी बाजारात मिळणारे तणनाशक नेऊन त्याची फवारणी करतात त्यासाठी एकरी एक हजार पाचशे रुपये खर्च येतो तर मजुर मिळाले तर खुरपणी साडी एकरी दोन ते तीन हजार रुपये लागतात. मजुर मिळत नसल्याने शेतकरी सर्रासपणे तणनाशकाचीच फवारणी करतात यावर्षी देखील शेतकऱ्यांनी तणनाशकाचीच फवारणी केली. बाजारातुन नामांकित कंपनीचे महागड्या औषधाची फवारणी करुन देखील तण जळले नाही.काही शेतकऱ्यांनी तर दोन दोन फवारण्या घेतल्या तरी तण कायम आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता कोळपणी नंतर खुरपणी करणे गरजेचे झाले आहे.पेरणीसाठीच कर्जबाजारी झालेला शेतकरी आता परत मशागती साठी देखील कर्जाच्या ओझ्याखाली दबल्या जाणार आहे.
नामांकित कंपनीचे तणनाशक फवारणी करुन देखील काहीच फायदा न झाल्याने शेतकरी हताश झाला आहे.काही शेतकरी अजुनही तण जळणारच या आशेवर आहे.
……बनावट तणनाशक बाजारात आल्याची चर्चा
तणनाशकाची फवारणी केल्या नंतर तण जळतेच हा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.त्यामुळेच शेतकरी सर्रासपणे तणनाशकाची फवारणी करत असतात यावर्षी मात्र तणनाशकाची फवारणी करुन देखील काहीच फायदा झाला नाही.तणनाशकाची मागणी वाढल्याने नामांकित कंपण्याच्या औषधीचा खप मोठ्याप्रमाणावर वाढला होता याचाच गैरफायदा घेत बनावट तणनाशकाची विक्री होत असल्याची शेतकऱ्यां मधे चर्चा आहे.शेतकर्याची मागणी आहे. सध्या मार्केटमध्ये शेकडो कंपन्या चे खत किटकनाशक व बुरूषी नाशक सुक्ष्म अन्नद्रव्ये टाॅनिक इत्यादी उपलब्ध असुन सदर उत्पादनांची रासायनिक चाचणी साठी नमुना घेऊन त्यामध्ये दर्शवलेले घटक उपलब्ध आहे किंवा नाही याची शहानिशा करावी. सदर कंपनीचे
कीटक नाशक तणनाशक बुरूषी नाशक खत इत्यादी यांच्या विक्रीस बंदी आणुन बोगस कंपन्या वर गुन्हे नोंदविण्यात यावे.शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तालुका कृषी अधिकारी व कृषी विकास अधिकारी पंचायत समिती जिल्हा नियंत्रण अधिकारी यांनी प्रयत्न करावे कारण आजपर्यंत मागिल काही वर्षांची माहिती घेतल्यास विशिष्ट कंपनी चे श्याम्पल घेतल्या जातात बाकी विशिष्ट कालावधी साठी असलेल्या श्याम्पल चे नमुने घेतले जात नाही अशी चर्चा आहे तरी अधिकार्याणि उपलब्ध असलेल्या सर्व कंपन्यांच्या श्याम्पल चे नमुने घेऊन पाठवण्यात यावे अशी मागणी शेतकर्याच्या वतीने सतिश मवाळ
करत आहे.

Leave a Comment