तथागत ग्रुपच्या वतीने मेहकर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन !

 

सचिन खंडारे ( सिंदखेड राजा प्रतिनिधी )

दिनांक 06 डिसेंबर रोजी मेहकर येथे विश्वरत्न, परमपूज्य, बोधिसत्व, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनीर्वान दिना निमित्त पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले !
तथागत फाऊंडेशन व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा.संदिप भाऊ गवई यांच्या हस्ते विश्वरत्न,परमपूज्य, बोधिसत्व,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले !यावेळी त्यांनी छोटेखानी भाषणामध्ये सांगितले की, ६ डिसेंबर १९५६
विषम समाज व्यवस्थेचे चटके सोसत तमाम वंचीताना मायेची सावली देवून, धरती वरील क्रांती सूर्य अस्तास गेला परंतु जाण्यापूर्वी त्यांनी सकल मानव जातीला त्यांचे नैसर्गिक हक्क, न्याय, समान अधिकार बहाल केले.
संपूर्ण जगात कुठल्याही देशात नसेल असे महान संविधान अर्पण करून, बलाढ्य अशी लोकशाही बहाल केली ते म्हणजेच विश्वरत्न, परमपूज्य, बोधिसत्व, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा महामानवास त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी प्रणाम..

ज्ञानाच्या अथांग महासागरास विनम्र अभिवादन..!
यावेळी !
तथागत फाऊंडेशन व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा.संदिप भाऊ गवई,मा.सुभाष भाऊ बैलके,अनिल भाऊ देबाजे,कुणाल भाऊ माने,कैलास भाऊ दुगाने,अख्तर भाई कुरेशी, आरीफ शहा असलम भाई गवळी,कपिल इंगळे,प्रमोद अंभोरे,सतीश शेटाणे,सचिन बनचरे,व समस्त मित्रपक्ष आदी उपस्थित होते,

Leave a Comment