तथागत फाउंडेशन व तथागत ग्रुपमहाराष्ट्र तर्फे शेर ए टिपू सुलतान यांची जयंती साजरी !

 

सिंदखेडराजा (सचिन खंडारे )

20 नोव्हेंबर रोजी मेहकर येथील तथागत फाऊंडेशन व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य च्या वतीने शेर ए टिपू सुलतान यांच्या जयंती निमीत्त त्यांना आभिवादन करण्यात आले आणी मेहकर येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये तथागत ग्रुप महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री संदिप भाऊ गवई यांनी शेर ए टिपू सुलतान यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन अभिवादन केले व त्यांनी छोटेखानी भाषणामध्ये सांगितले की, शेर ए टिपू सुलतान (२० नोव्हेंबर) इ.स. १७५०-४ मे, इ.स. १७९९) हे तत्कालीन म्हैसूरचे राजे होते. हे म्हैसूरचा सुलतान हैदरअली व त्याची पत्नी फक्र-उन-निसा यांचे पुत्र होते. टिपूनां म्हैसूरचा वाघ म्हणत. इंग्रजांविरुद्ध युद्ध लढणारे ते युद्ध होता इंग्रजांना लढा की पडा करून सोडलं होतं..आज त्यांची जयंती मुस्लीम व हिंदू बांधवानी मिळुन साजरी करण्यात आली….. यावेळी तथागत फाउंडेशन व तथागत ग्रूप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा,श्री.संदिप भाऊ गवई , मा.सुभाष भाऊ बैलके, मा.अनिल भाऊ देबाजे मा.अख्तर भाई कुरेशी,कुणाल भाऊ माने, कैलास दुगाने,राजकुमार उचित, कपिल इंगळे,प्रमोद अंभोरे विजय सरकटे,समाधान पवार,अस्सलम भाई गवळी,पंकज जाधव,यांची उपस्थित होती..!

Leave a Comment