तळेगाव पोलिसांची मोठी  कारवाई अट्टल दुचाकी चोर ‘इमरान’ला पोलिसांनी केले गजाआड

 

तळेगाव (श्या. पंत.) : कॉम्प्लेक्ससमोर उभी करून ठेवलेली दुचाकी अज्ञाताने चोरून नेली होती. याप्रकरणी तळेगाव पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती.

पोलिसांनी तपास करून गुन्ह्यातील अट्टल दुचाकी चोर शेख इमरान शेख इकबाल (२९) रा. गौरखेडा याला अटक केली. पोलिसांनी चोरीतील दुचाकीही जप्त केली.

मोहम्मद रिजवान साकिर अली रिजवान (रा. आर्वी) हा त्याच्या मित्रांसह १० मार्च रोजी शांताबाई कॉम्प्लेक्समध्ये टाईल्समध्ये कामानिमित्त गेला होता. त्याने त्याची एम.एच. ३२, एए. ७१८७ क्रमांकाची दुचाकी कॉम्प्लेक्सखाली उभी करून ठेवली होती.

मोहम्मद रिजवान हा डिक्कीतील डबा घेण्यास गेला असता त्याला दुचाकी दिसून आली नाही. मोहम्मद रिजवान याने याबाबतची तक्रार तळेगाव पोलिसांत दिली पोलिसांनी आरोपी नामे शेख इमरान

दोघांनी कचरागाडीवरील युवकास बदडले

घरातील कचरा उचलण्यास मनाई केली असता भावंडांनी कचरा गाडीवर असलेल्या युवकास लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन अश्लील शिवीगाळ केली. ही घटना वॉर्ड १७ मध्ये घडली. याप्रकरणी कारंजा पोलिसात ११ रोजी तक्रार दाखल करण्यात आली. चालक रशीद अंसारी आणि प्रवीण पांडुरंग चरडे हे दोघे कचरा गाडी घेऊन वॉडॉवॉर्डात फिरत असताना शक्तीसिंग टाक याने प्रवीणला माझ्या घरातील कचरा उचलून गाडीत टाक, असे म्हटले.

प्रवीणने हे काम आमचे नाही तुमचे आहे, असे म्हटले असता शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दरम्यान, शक्तिसिंग टाक आणि हिम्मतसिंग टाक यांनी प्रवीण चरडे याला शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जखमी केले.

अटक केलेल्या दुचाकी चोरट्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी.

शेख इकबाल याला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्यास अटक करून दुचाकी हस्तगत केली. ही

कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक आशिष गजभिये यांच्या नेतृत्वात दिपेश ठाकरे यांनी केली.

Leave a Comment