तळेगाव येथे सिंघम ठाणेदार संदीप धोबे रुजू कर्तुवाचाचे महामेरू अशी त्यांची ओळख

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक.

तळेगाव:-वर्धा जिल्हा हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जातो.त्यामधील तळेगाव हा अनेक आव्हानांचा माहेरघर म्हणून सुपरिचित आहे.

त्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि तालुक्यातील शांतता,सुरक्षा व्यवस्थित पार पाडण्यासाठी कतृत्वाचा महामेरू,प्रामाणिक व्यक्तीमत्वाचे धनी ज्यांची कार्यप्रणाली पाहून ठाणेदार म्हणून संदीप धोबे यांची तळेगाव श्यामजी पंत ठाण्यात यांची नियुक्ती करण्यात आली असून नव्याने जबाबदारी सांभाळून एक आठवडा झाला आहे.

आणि एका आठवड्यात त्यांनी आपल्या परिसराला वळण लावण्यासाठी सुरुवात केल्यामुळे सुरू असलेले अवैध गोरख धंद्यांना निच्छितच खिळ बसणार आहे. अवैध गोरख धंदे करणाऱ्यांचे सध्या धाबे दणाणले आहेत.

तालुक्यातील अवैध धंदे त्यामध्ये दारू,रेती,सट्टा मटका,जुगार,अवैद्य धाब्यावर कडक नजर असणार आहे.गावातील सर्व सामान्य माणसांसाठी मोठा आशेचा आणि सुखाचा किरण निर्माण होईल अशी आशा वर्तविली जात आहे.

पोलिस निरीक्षक हे न्याय आणि सुव्यवस्थेचा केंद्र बिंदू असल्याने धोबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व कामे सुरळीत चालतील यात शंका नाही.

एकंदरीत सर्वसामान्य नागरीकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Comment