@ पर्यायी पिक म्हणुन शेतकरी करणार सुर्यफुल पिकाची पेरणी.
संतोष काळे बाळापूर
सुर्यफुल हे बहुगुणी कमी कालावधीत येणारे पिक आहे. त्याच बरोबर कोणत्याही हंगामात कमी पाण्यात येणारे अत्यंत उपयुक्त पिक असल्याने. शेतकऱ्यांनी सुर्यफुलाची शेती केल्यास फायदेशीर ठरु शकतो या बाबत पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तेलबिया विभागाच्या प्रमुखांनी सविस्तर मार्गदर्शन केल्याने येथिल शेतकऱ्यांनी सुर्यफुल पिक घेण्यास अनुमती दर्शविली आहे. त्यामुळे आता तामशी येथिल शेतकऱ्यांनी शिवारात ७५ एकरांवर सुर्यफुल पिक फुलणार आहे.
सूर्यफूल हे सुर्यप्रकाशात संवेदनशील नसल्याने खरीप, रब्बी व उन्हाळी या तिनीही हंगामात घेता येणारे महत्वपूर्ण तेलबिया पीक आहे. पाण्याअभावी जर खरिपाची पेरणी लांबली तर खरिपातील मुख्य पिकाला पर्याय म्हणून सूर्यफुलाची पेरणी केली जाऊ शकते. अल्प पाण्यात येणारे तसेच कमी उत्पादन खर्च यासारख्या वैशिष्ट्यामुळे सामान्य शेतकऱ्यांना परवडणारे पीक आहे. त्याचप्रमाणे सूर्यफुलाच्या तेलाला बाजारात मोठी मागणीही आहे. शेतकऱ्यांनी अल्प खर्चात मोठे उत्पन्न देणाऱ्या या सूर्यफुल पिकाची लागवड केल्यास शेतकऱ्यांसाठी एक पर्वणीच ठरू शकते या बाबत डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील तेलबिया संशोधन विभागाचे विभाग प्रमुख डॉ.संतोष गहुकर यांनी तामसी येथे आयोजित कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंञणा (आत्मा) अतंर्गत एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केल्यानतंर येथील शेतकऱ्यांनी सूर्यफूल पीक घेण्यास अनुमती दर्शविली आहे त्यामुळे आता तामसी येथील जवळपास ७५ एकरावर सूर्यफूल पीक फुलणार आहे. सूर्यफुल हे एक बहुगुणी, कमी कालावधीत येणारे तसेच तिनीही हंगामात हे पीक घेता येत असल्याने कोणत्याही ठिकाणी या पिकाची उगवण क्षमता चांगली असणार आहे. कमी पाण्यात तयार होणारे असे अत्यंत उपयुक्त पीक आहे. या पिकाचे रब्बी हंगामात अपेक्षित उत्पादन मिळवायचे असल्यास पेरणी, आणि बिजप्रक्रिया व्यवस्थित होणे गरजेचे असल्याचेही यावेळी मार्गदर्शन करण्यात आले त्यानतंर आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व्हि.एम.शेगोकार यांनी खरीप हंगामातील सोयाबीन,तूर,या पिकाचे एकात्मीक पध्दतीने व्यवस्थापन या बाबत तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना वाचन साहित्य,माहीती पुस्तके देण्यात आली.यावेळी कृषी सहाय्यक उध्दव धुमाळे, प्रगतशील शेतकरी गणेश काळे, अजय काळे, सुधाकर केनेकर, मुकिंदा काळे, वैभव तामसकर, गणेश काळे, राष्ट्रपाल पातोडे, भास्कर काळे,विनोद भांबेरे, शंकर काळे, शुभम काळे, मिथुन काळे, सचिन तामसकर, दत्ता गिल्ले, रामदास बोरसे आदी शेतकरी बांधव बहुसंख्यने उपस्थित होते.