तालुक्यात बियाणे व रासायिक खतांचा मुबलक साठा शिल्लक आहे

0
766

 

यावल( प्रतिनिधी) विकी वानखेडे

 

खरीप हंगामाची सुरवात झालेली आहे परंतु पाऊस लांबणीवर पडल्यामुळे खरीप हंगामाची कामे खोळंबलेली आहेत. अशातच रासायनिक खतांचा तुटवडा असल्याच्या अफवांमुळे शेतकर्यांची धाकधूक वाढली आहे . पुरेसा पाऊस पडल्याशिवाय शेतकर्यांनी पेरणीची घाई करू नये व तालुक्यात.पुरेसा बियाणे व रासायनिक खतांचा साठा असल्याने कुणीही अफवांना बळी पडू नये असे आवाहन कृषी विभागामार्फत शेतकर्यांना करण्यात येत आहे. तसेच शेतकर्यांनी एकाच खताचा आग्रह न धरता संतुलित खतांचा वापर करावा म्हणजे उत्पन्नात वाढ होईय व अनावश्यक खर्चात बचत होईल. काही माध्यमातून खताच्या टंचाई निर्माण झाल्याच्या अफवा पसरविण्याच्या बातम्या पसरविण्यात येत आह त्यात तथ्य नसल्याचे कृषी विभागामार्फत सांगण्यात येत आहे.

तालुक्यात खतांचा व बियाण्यांचा पुरेसा साठ असून खतांची कृत्रिम टंचाई
निर्माण करण्याचा व अधिक किमतीत खतांची विक्री करण्याचा प्रयत्न केल्यास
भरारी पथकामार्फत कारवाई करण्यात येईल. ज्या शेतकर्यांना शक्य असेल त्यांनी
आवश्यक खतांची खरेदी करून घ्यावी धीरज हिवराळे गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक पं.स.यावल
पुरेसा पाऊस पडल्याशिवाय शेतकर्यांनी पेरणीची घाई करू नये व तालुक्यात.पुरेसा बियाणे व रासायनिक खतांचा साठा असल्याने कुणीही अफवांना बळी पडू नये सागर सिनारे तालुका कृषी अधिकारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here