Home Breaking News तिसऱ्या दिवसीही सीबीआई कडून रियाची चौकशी सुरुच

तिसऱ्या दिवसीही सीबीआई कडून रियाची चौकशी सुरुच

373
0

 

मुख्य संपादक
अनिलसिंग चव्हाण
सुर्या मराठी न्यूज

मुंबई | बॉलिवूड स्टार सुशांतसिंह राजपूत मृत्यूच्या प्रकरणी सीबीआय आज पुन्हा एकदा रिया चक्रवर्तीची चौकशी करणार आहे. याप्रकरणी सीबीआयनं काल, शनिवारी रिया चक्रवर्तीची खूप तास कसून चौकशी केली. पण सीबीआयला आणखीन काही मुद्द्यांवर माहिती घ्यायची आहे. ज्यासाठीच रियाला सगल तिसऱ्या दिवशी चोकशीसाठी बोलवण्यात येतं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सीबीआय रियाकडून मिळालेल्या उत्तरांनी समाधानी नाही.

दोन दिवसात 17 तास चौकशी
गेल्या दोन दिवसांपासून सीबीआय रियाची चौकशी करत आहे. पहिल्या दिवशी, शुक्रवारी, 28 ऑगस्टला सीबीआयकडून रियाला प्रथमच बोलावण्यात आले. यादरम्यान, सुमारे 10 तास सीबीआयने रियाची चौकशी केली.
तर शनिवारी 29 ऑगस्ट रोजी रियाची 7 तास चौकशी केली गेली.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुसर्‍या दिवशी चौकशीसाठी रिया डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये पोहोचण्यापूर्वी सुशांत सिंग प्रकरणी संबंधीत सर्व जण उपस्थित होते. यांमध्ये सॅम्युअल मिरांडा, सिद्धार्थ पिठानी, नीरज सिंग यांची सीबीआयने चौकशी केली आहे.

Previous articleब्रेकिंग … सूनगाव येथे कोरोना पॉझिटिव्ह
Next articleपति – पत्नी जागिच ठार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here