Home Breaking News तिहेरी तलाक चा पहिला गुन्हा.तीन तलाक कायद्याअंतर्गत 6 जणांविरुद्ध गुन्हे दाखल…

तिहेरी तलाक चा पहिला गुन्हा.तीन तलाक कायद्याअंतर्गत 6 जणांविरुद्ध गुन्हे दाखल…

498
0

 

गजानन सोनटक्के जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगाव जामोद येथे तिहेरी तलाक चा प्रथम गुन्हा दाखल तर बुलढाणा जिल्ह्यातील तिहेरी तलाक ची ही चौथी घटना जळगांव जा.शहरातील सुलतानपुरा येथे घडली आहे .
सविस्तर असे की फिर्यादीचे लग्न आरोपी सलमान शेख रा.निभोरा रावेर यांच्यासोबत 25 एप्रिल 2014 ला वडोदा येथे झाले होते फिर्यादीस तीन अपत्य असून आरोपी एक ते सहा यांनी लग्न झाल्यापासूनच फिर्यादीस दोन ते तीन वर्षे चांगले वागविले व त्यानंतर आरोपींनी फिर्यादीस माहेरून पैसे आण असा नेहमी तगादा लावला. फिर्यादीने माहेरून पैसे न आणल्याने या सर्व आरोपींनी फिर्यादीस मारहाण करून अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली
दिनांक 26 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 11 वाजेच्या दरम्यान जळगाव जामोद येथील सुलतानपुरा येथे फिर्यादीचे पती शेख सलमान याने शेख शाहरुख शेख कयूम व शेख भुरा शेख कयुम या दोघांना सोबत घेऊन सुलतानपूर येथे फिर्यादीच्या घरी दाखल झाले व फिर्यादीस म्हणाले मुझे 80 हजार रुपये अभी के अभी दो नही तो मै आपको तलाक दे दूंगा अशी धमकी दिली त्यानंतर सलमान शेख याने त्याच्या आईला फोन करून स्पीकर ऑन करून फिर्यादी सोबत बोलायला लावले फिर्यादी सोबत बोलत असता 80 हजार रुपये नाही दिले तर तू फिर्यादी सोबत तिथेच तलाक देऊन टाक असे म्हणाली त्यानंतर सलमान शेख यांनी फिर्यादीस त्या दोघांसमोर तलाक तलाक तलाक असे म्हणून तुझा व माझा पती-पत्नी म्हणून असलेला संबंध संपला असे म्हणून फिर्यादीस शिवीगाळ करून तिथून निघून गेला अशी लेखी तक्रार फिर्यादीने जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली त्यावरून जळगाव जामोद पोलीस स्टेशनने आरोपीविरुद्ध अपराध नंबर 993/ 2020 कलम 498,294,323,504 506,34 भारतीय दंड विधान स ह कलम 4 मुस्लिम महिला विवाह संरक्षण कायदा सन दोन हजार एकोणवीस नुसार आरोपी शेख सलमान शेख कयुम वय 30 वर्ष, जमीला शेख कयुम फिर्यादी ची सासू, शेख कयुम शेख गणी फिर्यादी चा सासरा, शेख शाहरुख शेख कयूम, शेख भुरा शेख कयूम, शेख कुब्रा शेख गणी फिर्यादीची आत्या सासू, या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास हेडकॉन्स्टेबल दयाराम कुसुम्बे, योगेश निंबाळकर ,कॉस्टेबल अनिल भुले पाटील हे करीत आहे.तसेच जळगाव जामोद येथे तीन तलाक चे हे पहिलेच प्रकरण आहे.

Previous articleदौंड तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याकरिता शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पासलकर यांचा पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडे पाठपुरावा !!
Next articleअप्पू पॉईंट जवळ गिट्टी खदान व्यवसायिकाची गोळी झाडून हत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here