Home Breaking News तेलवर्गीय करडी व सुर्यफुल पिक होत आहेत नामषेश.पारंपरिक पिके घेतली पाहिजे कृषी...

तेलवर्गीय करडी व सुर्यफुल पिक होत आहेत नामषेश.पारंपरिक पिके घेतली पाहिजे कृषी सहाय्यक – पवार

415
0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

जुन्या काळी महत्त्वाचे कडधान्य असणारे व आहारामध्ये प्रमुख्याने समावेश असणारी करडी पिक व सुर्यफुल नामशेष होत असून ज्वारीमध्ये दिसणारी करडीचे पिक सिंदखेड राजा तालुक्यामधून नामशेष होण्याच्या मार्गावर असून या करडी व सूर्यफूल पिकाचे संवर्धन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

कडधान्य मध्ये महत्त्वाची कडधान्य असलेल्या करडी व सूर्यफुलाच्या उत्पादनावर मोठा फटका बसला असून हे पीक नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. एरवी सिनखेडराजा तालुक्यातील बहुतांश साखरखेर्डा शिंदी रताळी गोरेगाव भागात दिसणारे करडी व सूर्यफूल पीक पीक घेणे कष्टकरी शेतकऱ्यांनी बंद केलेआहे त्याचे कारणही लवकरात लवकर उत्पन्न घेऊन पैसे मिळवता आले पाहिजे हेच आहे त्यामुळे करडी व सुर्यफुल पिकांवर नामशेष होण्याची वेळ आली आहे.
जुन्या काळी प्रत्येक शेतकरी व प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणामध्ये खाण्याचे पिकांचे उत्पादन घेतले जात असे तसेच हे पीक झालेले उत्पान्न गावातच व गावातीलच तेल्या कडे देण्यात येईल व तोच घरच्या घाण्यामध्ये तेल व जनावरांसाठी करडीची ढेप निर्माण करीत परंतु आधुनिकीकरणाच्या
नादामध्ये सोयाबीन व कपाशीचे
तेल वापरण्याचे प्रमाण वाढली असल्याचे तसेच करडीचे तेल महागात पडत असल्याने लोकांनी करडीचे घेण्याकडे पाठ फिरवली त्यामुळे या पिकाचा पेरा कमी झाला याचा परिणाम हे पीक घेणे शेतकऱ्यांनी कमी केले तसेच हे पीक घेतल्यावर शेतात काटे असल्याने पिकाचे निंदणी करणे मोठी अवघड होत असल्याने शेतकरी हे पीक घेण्याचे टाळत आहे.याबाबत कृषी सहाय्यक शरद पवार यांच्याशी चर्चा केली असताना त्यांनी करडी व सूर्यफूल हे पीके पारंपरिक पिके घेणे गरजेचे आहे ।नगदी पिके घेण्याच्या नांदत शेतकऱ्यांनी याकडे पाठ फिरवली असल्याचे त्यांनी सांगितले आहे !
पूर्वी शेतामध्ये सूर्यफूल दिसायचे तर ते तोडून खाण्याची मजा बच्चे कंपनीमध्ये औरत होती करून ती आता दिसत नाही

Previous articleस्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा ची कार्यवाही अवैध शस्त्र विक्री करीता बागडणाऱ्या इसमास केले जेरबंद 3 पिस्टल 12 जिवंत काडतुसे जप्त..
Next articleग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी हॉटेल व धाबा ‘ वाईनबार ‘हाऊसफुल -अनेकांनी आयोजित केली बोकड्यांचे मटन पार्टी – – -बोकडांना चांगला भाव !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here