Home Breaking News दहशतवाद्यांच्या हल्ल्यात गोंदिया जिल्ह्यातील जवान नरेश बडोले शहिद.

दहशतवाद्यांच्या हल्ल्यात गोंदिया जिल्ह्यातील जवान नरेश बडोले शहिद.

231
0

 

सडकअर्जुनी दि.24: जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात गोंदिया जिल्ह्यातील सडकअर्जुनी तालुक्यातील ब्राह्मणी येथील जवान नरेश उमराव बडोले (वय ४९) शहीद झाले आहेत. केंद्रीय राज्य राखीव दलाच्या (सीआरपीएफ) ११७ बटालियनमध्ये ते कार्यरत होते.
गोंदिया जिल्ह्यातील अर्जनी तालुक्यातील बाम्हणी हे बडोले यांचे मूळ गाव. २४ एप्रिल १९७१ रोजी जन्मलेले बडोले १९८९ मध्ये सीआरपीएफला रुजू झाले होते. बडगम जिल्ह्यातील छदुरा परिसरात गस्तीवर असताना त्यांच्या पथकावर आज सकाळी पावणे आठच्या सुमारास दहशतवादी हल्ला झाला. मोटरसायकलवरून आलेल्या दहशतवाद्यांनी बडोले यांच्या पथकाच्या दिशेनं अंदाधुंद गोळीबार केला. यावेळी उडालेल्या धुमश्चक्रीत बडोले गंभीर जखमी झाले. जखमी बडोले यांची रायफल घेऊन दहशतवाद्यांनी पळ काढला. बडोले यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यामागे पत्नी प्रमिला, मुली प्रज्ञा,मोनाली, एक बहीण, एक भाऊ असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. अंत्यसंस्कारासाठी त्यांचे पार्थिव नागपूरला आणण्यात येणार आहे. त्यांचे निवासस्थान वैशाली नगर नागपुर येथे आहे. त्यांच्या शहीद झाल्याची माहिती मिळतात त्यांच्या कुटुंबातील सदस्य अंत्यदर्शनासाठी नागपूरला रवाना झाले आहेत.अशी माहिती आहे.

Previous articleनवेगावबांध येथे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण व मार्गदर्शन,पोलीस विभागाचा स्तुत्य उपक्रम
Next articleशेतकरी विरोधी अध्यादेश बाबद तीव्र निदर्शन आंदोलन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here