दि. 20 जानेवारी ला जिल्हा नियोजन समिती सभागृहात मा.अप्पर जिल्हाधिकारी गीते साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मा.सुनील शेळके साहेब.
उपजिल्हाधिकारी(पुनर्वसन) आणि नितीन सुपेकर साहेब मा.अधीक्षक अभियंता बुलडाणा पाटबंधारे प्रकल्प मंडळ बुलडाणा यांच्या उपस्थितीत तातडीने एक बैठक बोलविण्यात आली.
ही बातमी नक्की पहा
https://www.suryamarathinews.com/post/8188
गोर गरीब शेतकऱ्यांनाच्या जमिनीचे भूसंपादन होऊन देखील त्यांना मोबदला अदा करण्यात आला नाही.
गेल्या 17 ऑगस्ट 2020 रोजी मा.अधीक्षक अभियंता बुलडाणा पाटबंधारे प्रकल्प मंडळ बुलडाणा यांच्या दालनात खडकपूर्णा प्रकल्प विभाग.
देऊळगाव राजा अंतर्गत गांगलगाव वितरीकेवरील संबंधित कास्तकार यांच्या मागण्या विभागीय स्तरावरुन पूर्ण न झाल्यामुळे मा.अधीक्षक अभियंता यांच्या दालनात.
ऋषिकेश म्हस्के व संबंधित कास्तकार यांच्यासोबत दुपारी 1:00 वाजेपासून तर रात्रीच्या 11:00 वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन केले.
संबंधित कास्तकार यांच्या मागण्या आम्ही विविध कालावधीत पूर्ण करून असे आश्वासन/करावयाची कार्यवाही पत्र मा.अधीक्षक अभियंता यांनी दिले व आंदोलन माघे घेऊन सांगता करण्यात आली.
त्यानंतर 6 महिने होऊन सुद्धा हे काम पूर्ण झाले नाही .
त्या कामाचा पाठपुरावा करण्यास गेल्या नंतर मा.अधीक्षक अभियंता उडवा उडवी चे उत्तर देतात.
हे माझं काम नव्हे ते कार्यकारी अभियंता यांचे कार्य आहे मला काय एवढं काम आहे का आमच्याकडे मनुष्यबळ नाही.
त्यानंतर दि 15 डिसेंम्बर ला दुपारी 3 वाजेपासून तर 7 :33 वाजेपर्यंत सहायक अभियंता खडकपूर्णा प्रकल्प चिखली यांच्या कार्यालयात ठिय्या देऊन होते.
ही बाब मा.पालकमंत्री डॉ राजेंद्रजी शिंगणे साहेब यांनी लक्ष्यात घेऊन काही मुद्याचा निपटारा करण्यात आला.
झालेल्या बैठकीत ऋषीकेश म्हस्के यांनी शेतकऱ्यांची बाजु मंडळी आणि 15 फेब्रुवारी ला उर्वरित शेतकऱ्यांचे कामे मार्गी लागतील असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
तसेच उर्वरित कामाचे निवेदन यावेळी ऋषीकेश म्हस्के व शेतकऱ्यांनी सादर केले.
15 फेब्रुवारी पर्यंत कामे पूर्ण न झाल्यास त्रिव आंदोलन करण्यात येईल अशा इशारा ऋषिकेश म्हस्के यांनी दिला.
यावेळी मा.अप्पर जिल्हाधिकारी गीते साहेब तसेच मा.सुनील शेळके साहेब उपजिल्हाधिकारी(पुनर्वसन) आणि नितीन सुपेकर साहेब मा.अधीक्षक अभियंता बुलडाणा पाटबंधारे प्रकल्प मंडळ बुलडाणा,मा.संत साहेब व संबधीत सर्व अधिकारी उपस्थित होते.