दिवाळीच्या खर्चाला फाटा देत,धारा येथील युवकांनी केले जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना बॅग व खाऊ वाटप:

 

प्रतिनिधी:(जालना)जालना तालुक्यातील धारा येथील युवक वंकर घेंम्बड व कृष्णा घेम्बड यांनी पारंपरिक पद्धतीने साजरा होत असलेल्या दीपावली या सणावर होणारा व्यर्थ खर्च टाळत,धारा या गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना बॅग व खाऊ वाटप केले आहे.या त्यांच्या उल्लेखनीय कार्यामुळे ग्रामीण भागातील धारा येथील शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना शाळेत जाण्यासाठी अतिशय चांगल्या दर्जाचे बॅग व खाऊ मिळाल्यामुळे,विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण झाला आहे.

यंदा अतिवृष्टीमुळे शेत पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे,शेतकऱ्यांचा लाखो रुपये पाण्यात गेले आहे.व धुळीस मिळाले आहे.त्यामुळे फुल ना फुलाची पाकळी म्हणून गाव खेड्यातील मुला-मुलांची दिवाळी गोड व्हावी या आशेने मी नेहमी मदत करीत असल्याचे वंकर घेंम्बड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.

वंकर घेंम्बड यांनी पुढे सांगितले की,माझा भाऊ कृष्णा घेम्बड यांनी मला फोन केला आणि तो म्हणाला की मला दिवाळी सणानिमित्त होणारा फालतू खर्च टाळून आपल्या गावातील शाळेतील सर्व मुला मुलींना चांगल्या दर्जाची बॅग वाटप करायचा आहे.तर तुझ्याकडे सरांना फोन नंबर असेल तर त्यांना विचार की,शाळेमध्ये किती मुलं-मुली आहे.मी सरांना फोन केला आणि किसन ईरमुरे सरांनी सांगितले की इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत एकूण 50 ते 60 विद्यार्थी आहे.मी सरांना चांगल्या दर्जाची बॅगची व्यवस्था करतो म्हणून सांगितले.सर म्हणाले की तुम्ही कधी या मी येतो.आणि परत मी कृष्णाला फोन केला की सर म्हणाले की तुम्ही या मी येतो.म्हणून मी मुंबई वरून पुणे तसेच दीपावली निमित्त घरी आलो व सरांनी दिवाळीच्या सुट्टीमध्ये त्यांच्या स्वतःच्या घरी न जाता विद्यार्थ्यांसाठी गाव खेड्यांच्या शाळेत आले व आपला अमूल्य वेळ दिला याबद्दल वंकर घेम्बंड यांनी सरांचे आभार मानले.

तसेच वंकार घेंम्बड पुढे म्हणाले की,त्यानंतर मी शंकर भाऊ यांना म्हणालो की,आपण मुलांना बॅग वाटप बरोबर,खाऊ वाटप करू आणि त्यांनी बिस्किट,शेंगदाणा चक्की आणले व शाळेमध्ये सर्व विद्यार्थी पालक व गावातील मित्रमंडळी व शिक्षक यांना बोलावून आज दिपावली निमित्त वाटप केले.याबद्दल शिवराजे ग्रुप धाराचे अध्यक्ष- शंकर घेंम्बड,उपाध्यक्ष- कृष्णा घेम्बड,सचिव- भरत घेंम्बड,सल्लागार-वंकर घेंम्बड यांचे प्रशंसनीय व उल्लेखनीय तसेच सामाजिक कार्य केल्याबद्दल ग्रामीण भागामध्ये एक आदर्श निर्माण झाला आहे. असेच नेहमी समाज उपयोगी कार्य यांच्या हातून घडो हीच आई तुळजाभवानी प्रार्थना करीत आहे.

प्रतिनिधी-तुकाराम राठोड,सावंगी तलाव,जालना

Leave a Comment