दुर्देवी! वीज पडून बैलाचा मृत्यू; ऐन पेरणीच्या तोंडावर बैल गमावल्याने शेतकरी हतबल

 

पातुर तालुक्यातील वाहळा बु.येथील घटना; नुकसानभरपाई मागणी

योगेश नागोलकार
प्रतिनिधी राहेर पातुर

राहेर/ पातुर तहसील अंतर्गत येत असलेल्या वाहाळा बु येथील शेत शिवारातील बाबुराव लक्ष्मण पुंडे या अल्पभूधारक शेतकऱ्याचा शेतात निंबाच्या झाडाला बांधलेल्या 2 बैलावर वीज पडल्याने बैल जागीच ठार झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांचे ऐन पेरणीच्या तोंडावर बैल गमावल्याने शेतकरी हतबल झाला आहे. ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्याचे अंदाजे १ लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.
शिवाय अल्पभूधारक शेतकरी बाबुराव लक्ष्मण पुंडे व त्यांची फॅमिली अंतरावर बसले होते त्यामुळे सुदैवाने त्याचे प्राण वाचले आहेत. खरीप हंगामाच्या पेरणीच्या आधीच वीज पडून बैलाचा मृत्यू झाल्याने शेतकरी हतबल झाला असून प्रशासनाने तत्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी अल्पभूधारक शेतकरी यांनी केली आहे.
पावसाचे प्रमाण कमी असले तरी वीज पडून जीवितहानी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहीती गावातील नागरिकांनी तहसीलदारांना कळवली त्यानंतर तलाठी व काही साथीदार यांनी वरिष्ठांना कळवून या घटनेचा तलाठी यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करण्यात आला व डॉक्टर वैद्यकीय अधिकारी राऊत यांना माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी भेट देऊन जागेवरच पोस्टमार्टम करण्यात आले. व दोन्ही बैलांना दफन करण्यात आले.

Leave a Comment