देशी दारूची अवैधरित्या वाहतुक करणाऱ्यानवर गुन्हे प्रगटीकरण पथकाची कार्यवाही

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगनघाट :- दि.7 जानेवारी रोजी पोलीसांना मिळालेल्या खात्रीशीर खबरी कडून नंदोरी चौक हिंगणघाट येथे नाकेबंदी केली असता आरोपी 1) अनुज प्रमोद काटकर वय 24 वर्ष 2) निखील प्रमोद काटकर वय 25 वर्ष 3) शोख नौशाद अब्दुल रऊफ वय 30 वर्ष तिन्ही रा. शास्त्री वार्ड हिंगणघाट 4) शेख ईजाज शेख हनीफ वय 39 वर्ष रा. खंडोबा वार्ड हिंगणघाट यांचे ताब्यातील अँटो क्रमांक .एम. 32/ सी / 9447 ने देशी दारूची अवैधरित्या वाहतुक करीत असतांना मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातुन देशी दारूने भरलेल्या 90 मि.ली.च्या एकुण 182 निपा किंमत प्रत्येकी 100/- रू प्रमाणे 18,200/- रूपये आणी अँटो क्रमांक एम.एम. 32/सी / 6248 किंमत 1,50,000/- रूपये असा एकून 1,68,200 /- रू चा माल मिळुन आल्याने जप्त करून आरोपीतां विरूध्द गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

आरोपीस अटक करण्यात आली असुन पुढील तपास नापोशी आशिष गेडाम करीत आहे.
सदरची कार्यवाही श्री. नुरूल हसन पोलीस अधिक्षक वर्धा, श्री. डाॅ. सागर कवडे अपर पोलीस अधिक्षक वर्धा, श्री. दिनेश कदम उप विभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांचे मार्गदर्शनात श्री. के.एम. पुंडकर पोलीस निरीक्षक यांचे निर्देशानुसार गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पो.हवा. विवेक बनसोड. ना.पो.शी, पंकज घोडे, आशिष गेडाम, प्रशांत वाटखेडे, पो.कॉ. उमेश बेले यांनी केली.

Leave a Comment